नवी दिल्ली : सोमवारी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वप्रथम दिवंगत चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या पत्नी अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत हिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तिच्या नेतृत्वाखाली संघाने यावर्षी एकदिवसीय विश्वचषक जिंकला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ६६ व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. २०२६ मध्ये एकूण १३१ व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, त्यापैकी उर्वरित ६५ विजेत्यांना पुढील टप्प्यात सन्मानित केले जाईल, ज्याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. जेव्हा हेमा यांनी हा सन्मान स्वीकारला, तेव्हा त्यांची मुलगी आहनाच्या डोळ्यातून अश्रू तरळले. अरुणाचल प्रदेशातील प्रख्यात समाजसेवक टेची गुबिन यांना समाजसेवेतील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
















