नांदेड : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यामुळे सर्वसामान्यांसह शेतक-यांचा संताप अनावर झाला आहे. या पार्श्वभूमिवर आक्रमक झालेल्या युवका काँगे्रसच्या पदाधिका-यांनी मुदखेड येथील पेट्रोल पंपावर मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ असे अनोखे आंदोलन केले.
नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेलचा मोठा तुटवडा भासत आहे. यामुळे सर्वसामान्यांचा संताप अनावर झाला आहे. तर डिझेल तुटवल्यानंतर शेतकरी, सामान्यांसह युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. नांदेड जिल्हयातील मुदखेड येथील पंपावर डिझेल घेण्यासाठी आलेल्या शेतक-यांना काँग्रेसकडून मेलोडी चॉकलेटच वाटप करून मंगळवारी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. मेलोडी खाओ डीझेल भुल जाओ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
















