विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी निधीपासून वंचित

मुंबई : शिवसेना (उबाठा)चे आमदार कैलास पाटील यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निधीपासून वंचित ठेवण्याचे धोरण राबवले जात असल्याचा दावा केला. लोकप्रतिनिधी दुस-या पक्षाचा आहे म्हणून त्या मतदारसंघातील जनतेलाच ब्लॉक करणे सुरू आहे.

कैलास पाटील म्हणाले की, मंत्रिपदाची शपथ घेताना ममत्वभाव न बाळगता काम करेन अशी शपथ घेतली जाते. मात्र प्रत्यक्षात विरोधी पक्षाच्या मतदारसंघांमध्ये विकासकामे आणि निधी रोखला जात असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार किंवा खासदार दुस-या पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनता एका पक्षाची नसते. सत्ताधा-यांना मतदान करणारे नागरिकही तिथेच राहतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाचा आहे म्हणून संपूर्ण जनतेलाच विकासापासून दूर ठेवणे योग्य नाही असे ते म्हणाले. राज्यातील सध्याच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांनी म्हटले की, यापूर्वीही अनेक सरकारे आली आणि विरोधी पक्षही होते. मात्र, आजच्या सरकारने विरोधी पक्षाच्या आमदार, खासदार, नगरसेवक आणि सरपंचांना निधीच मिळू नये, अशी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

यंत्रणा आणि विकासनिधीचा वापर करून विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधी अडचणीत कसा येईल, याचेच नियोजन सत्ताधा-यांनी केले आहे. कुठेही हालचाल करता येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असा आरोप त्यांनी केला.

शिवसेना, शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणार
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना कैलास पाटील म्हणाले की, ते अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आले असून त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मला जिल्हा परिषद आणि दोन वेळा विधानसभेत जाण्याची संधी केवळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे ज्यांनी मला शून्यातून उभे केले, त्या पक्षाशी आणि मला निवडून आणणा-या शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणे हीच माझी पहिली प्राथमिकता आहे असे त्यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17
Video thumbnail
Latur|एकमतचा दणका! झोपेतले पोलीस जागे, कोयता गँगची काढली धिंड
03:54
Video thumbnail
BREAKING : संच मान्यता निकषांवरून लातूरमध्ये शिक्षक संघटना आक्रमक;शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे
04:37
Video thumbnail
2019 च्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; सरकारला कैलास पाटलांचा सवाल #marathilivenews #breakingnews
02:21
Video thumbnail
Parbhani |ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण!;तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच..
00:54

Latest news