24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवब्राह्मण समाजच्या प्रमुख मागण्यांसाठी नळदुर्ग येथे गुरुवारी उपोषण

ब्राह्मण समाजच्या प्रमुख मागण्यांसाठी नळदुर्ग येथे गुरुवारी उपोषण

नळदुर्ग : प्रतिनिधी
ब्राह्मण समाजाच्या अनेक प्रमुख मागण्यासाठी गुरुवारी (दि.३०) नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राह्मण समाजाच्या वतीने एक दिवशीय लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत नळदुर्ग नगर पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची लवकरात लवकर निर्मिती करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी ब्राह्मण समाजाचे नेते दिपक रणनवरे हे मंगळवारपासून (दि.२८) जालना येथे आमरण उपोषणास बसणार आहेत. त्याला पाठींबा म्हणून नळदुर्ग शहरात सर्व शाखीय ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने गुरुवारी नळदुर्ग नगर परिषदे समोर सकाळी १० ते ५ या कालावधीत साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

हे आंदोलन ब्राह्मण समाजाचे नळदुर्ग शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. यावेळी सचिव मुकुंद नाईक, विकास कुलकर्णी, भाजपाचे युवा नेते सुशांत भूमकर, युवानेते उमेश नाईक, मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, सुहास पुराणिक, अजित भूमकर, अजय देशपांडे, संदीप वैद्य, शिरीष कुलकर्णी, चेतन दुबे, सुदर्शन पुराणिक, विशाल कुलकर्णी यांच्या सह्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR