35.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाचेन्नईसाठी प्रथमच कर्णधाराचे शतक, लखनौला २११ धावांचे आव्हान

चेन्नईसाठी प्रथमच कर्णधाराचे शतक, लखनौला २११ धावांचे आव्हान

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये ऋतुराज गायकवाड याने खणखणीत शतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्ससाठी कर्णधार म्हणून शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याला शिबम दुबेची खणखणीत साथ मिळाली आणि दोघांनी लखनौ सुपर जायंट्सची बेक्कार धुलाई केली. चेन्नईने ४ बाद २१० धावसंख्या उभारून लखनौला २११ धावांचे आव्हान देण्यात आले आहे.

अजिंक्य रहाणे ( १) व डॅरिल मिचेल ( १०) या दोन खेळाडूंना ४९ धावांवर माघारी पाठवताना छरॠ च्या लोकेश राहुल व दीपक हुडा यांनी अद्भुत झेल घेतले. पण, त्यांच्या या मेहनतीवर सीएसकेचा कर्णधार ऋतुराजने पाणी फिरवले. रवींद्र जडेजा १९ चेंडूंत १७ धावांवर झेलबाद झाला. ऋतुराज दमदार फटकेबाजी करताना दिसला. ऋतुराज रोखणे एलएसजीला अवघड होऊन बसले होते. सीएसकेसाठी सलामीवीर म्हणून २००० हून अधिक धावा करणारा ऋतुराज पहिला फलंदाज ठरला. शिवम दुबने १६ व्या षटकात सलग ३ उत्तुंग षटकार खेचून ऋतुसह २४ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ऋतुराजने पुढच्या षटकाची सुरूवात षटकाराने केली.

ऋतुराजने ५६ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि त्यात ११ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. सुरेश रैना, शेन वॉटसन व मुरली विजय यांच्यानंतर चेन्नईसाठी दोन शतकं झळकावणारा तो चौथा फलंदाज ठरला. ऋतुराजचे हे ट्वेंटी-२० तील सहावे शतक ठरÞले आणि त्याने लोकेश राहुलच्या विक्रमाशी बरोबरी केली. सूर्यकुमार यादव व शुबमन गिल ( ५) यांना त्याने मागे टाकले. दुस-या बाजूने शिवमनेही २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो २७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ६६ धावांवर रन आऊट झाला. शेवटचे दोन चेंडू खेळण्यासाठी महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला आणि चेपॉकवर एकच जयघोष सुरू झाला. ऋतुराज ६० चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०८ धावांवर नाबाद राहिला. धोनीने १ चेंडूंत चार धावा करून चेन्नईला ४ बाद २१० धावांपर्यंत पोहोचवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR