35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeनांदेडनांदेड जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले

नांदेड जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले

नांदेड : प्रतिनिधी
वादळी वा-यासह अवकाळी पावसाने नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही भागास मंगळवारी सायंकाळी पुन्हा झोडपले. गेल्या तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे उन्ळाळी पिकांसह फळबागांचे नुकसान होत आहे.

हवामान विभागाने नांदेड जिल्हयात विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, काही ठिकाणी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. या अनुषंगाने येलो अलर्ट जाहीर केला होता. ही शक्यता खरी ठरली असून गेल्या तीन दिवसापासून सायंकाळीच्या वेळी शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी व सोमवारी माहूर, किनवट, नांदेड, हदगाव, हिमायतनगर, मुखेड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

तर मंगळवारी सायंकाळी नांदेड शहरासह जिल्हयातील काही भागात वादळी वा-यासह अवकाळी पावसाने काही वेळ झोडपले. यावेळी विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता. या पावसामुळे उन्हाळी पिकांसह आंब्याचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR