आजपासून ‘गोलहल्ले’

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच गुरुवारपासून(११जून) फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको आणि कॅनडामध्ये रंगणार आहे. क्रीडा विश्वातील सर्वांत मोठा सोहळा मानल्या जाणा-या फुटबॉल विश्वचषकासाठी मध्यरात्रीपासून ४८ संघांत चढाओढ सुरू होईल. त्यामुळे जगभरातील फुटबॉलप्रेमी ‘गोलहल्ल्यांसाठी’ सज्ज झाले आहेत. हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झालेला असेल. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगणार आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले आहेत. मात्र, गत काही महिन्यांपासून अमेरिका, इराण, ईजिप्त यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे या स्पर्धेच्या आयोजनाबाबत शंका होती.

विविध देशांतील खेळाडूंचे रखडलेले व्हिसा, त्यांची सुरक्षितता, राहण्यासह प्रवासाची व्यवस्था यामुळे आधीपासूनच स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र या सर्व आव्हानांवर मात करत क्रीडाविश्व फुटबॉलच्या महाकुंभासह सज्ज झाले आहे. १९३० मध्ये पहिला विश्वचषक पार पडला. तेव्हापासून आजवर कधीच सहभागी संघांची संख्या ३२ च्या पुढे गेली नव्हती. फुटबॉलची क्रेझ जगभरात वाढत असून त्यामुळे स्पर्धाही रंगतदार होत आहे. म्हणूनच यंदा जागतिक फुटबॉल महासंघाने ४८ संघांचा स्पर्धेत समावेश केला आहे. मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीद्वारे विश्वचषकाचे बिगुल वाजेल. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, किलियाम एम्बाप्पे, नेयमार, हॅरी केन यासारख्या तारांकित खेळाडूंना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची संधी यानिमित्ताने फुटबॉलप्रेमींना मिळेल. २०२२ मध्ये मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करून विश्वचषक उंचावला होता. यंदा ते सलग दुस-यांदा जेतेपदाचा प्रयत्न करतील.

२०१८ चा विजेता फ्रान्स सलग तिस-यांदा अंतिम फेरी गाठून जेतेपद पटकावण्यास आतुर असेल. अर्जेंटिना, फ्रान्ससह पोर्तुगाल, इंग्लंड, स्पेन हे संघही तितक्याच तयारीने मैदानात उतरतील. बेल्जियम, क्रोएशिया, ब्राझील या संघांनाही कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे एकूणच ही स्पर्धा रंगतदार होणार यात शंका नाही. फिफा विश्वचषकात यंदा प्रथमच ४८ संघ सहभागी होत आहेत. यापूर्वीच्या विश्वचषकांमध्ये ही संख्या ३२ संघांपर्यंत मर्यादित होती. केप व्हर्डे, कुरासाओ, जॉर्डन व उझबेकिस्तान हे चार संघ प्रथमच विश्वचषकात सहभागी होत आहेत. यंदाच्या विश्वचषकात एकूण १,२४८ खेळाडूंचा समावेश असेल. त्यापैकी ३५७ खेळाडूंनाच विश्वचषकात खेळण्याचा अनुभव आहे. यंदाच्या विश्वचषकात २० वर्षांपेक्षा कमी वय असलेले २२ खेळाडू तर ४० हून अधिक वय असलेले ७ खेळाडू सहभागी होत आहेत. उष्ण वातावरणामुळे यंदा प्रत्येक लढतीत दोन वेळा पाणी पिण्यासाठी ३ मिनिटांची विश्रांती दिली जाणार आहे. पहिल्या सत्रात २२ व्या मिनिटाला तर दुस-या सत्रात ६७ व्या मिनिटाला विश्रांती दिली जाईल. त्यामुळे त्याचा खेळाडूंसह प्रशिक्षकांना रणनीती आखण्यासाठी मदत होऊ शकेल.

एका गटात प्रत्येकी चार संघ याप्रमाणे एकूण १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ व तिस-या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघ म्हणजेच एकूण ३२ संघ बाद फेरीत जातील. साधारणपणे भारतीय वेळेनुसार ९.३० वाजल्यापासून ते सकाळी ९.३० पर्यंतच्या वेळेत १६ ठिकाणी हे सामने होतील. २८ जूनपर्यंत साखळी फेरी रंगणार आहे. त्यानंतर बाद फेरीच्या लढतींना प्रारंभ होईल. काही तारांकित खेळाडूंसाठी हा अखेरचा विश्वचषक ठरू शकतो. अर्जेंटिनाच्या मेस्सीची २०२२ च्या विश्वचषकात स्वप्नपूर्ती झाली. यंदाही तो अर्जेंटिना संघाचा भाग असून सलग दुस-यांदा विश्वचषक जिंकण्याचे ३८ वर्षीय मेस्सीसह अर्जेंटिनाचे स्वप्न असेल. ४१ वर्षीय ख्रिस्तीयानो रोनाल्डो व त्याचा पोर्तुगाल संघही ऐतिहासिक जेतेपदासाठी आतुर आहे. या दोन्ही ता-यांचा हा अखेरचा विश्वचषक ठरू शकेल. उपान्त्यपूर्व फेरीत अर्जेंटिना व पोर्तुगाल संघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे. तसे झाले तर चाहत्यांना मेस्सी विरुद्ध रोनाल्डो ही जुगलबंदी पहावयास मिळेल. मेस्सी व रोनाल्डो या दोघांच्याही कारकीर्दीतील हा सहावा फिफा विश्वचषक आहे. त्यामुळे त्यांच्यावर सा-यांचे लक्ष असेल. फ्रान्सचा किलियान एम्बाप्पे, स्पेनचा लॅमिन यमाल, ब्राझीलचा व्हिनिशियस ज्युनियर, नेयमार, बेल्जियमचा जेरेमी डोकू यासारखे काही खेळाडू यंदाचा विश्वचषक गाजवू शकतात. एम्बाप्पेने २०२२ च्या विश्वचषकात ‘गोल्डन बूट’चा पुरस्कार पटकावला होता.

त्याला यावेळी इंग्लंडच्या हॅरी केनकडून झुंज मिळू शकते. विश्वचषकात सर्वाधिक गोल करणा-यांच्या यादीत जर्मनीचा निवृत्त फुटबॉलपटू मिरोस्लाव्ह क्लोस १६ गोलसह आजही अग्रस्थानी आहे. मेस्सी (१३ गोल)आणि एम्बाप्पे (१२ गोल)यांचे लक्ष्य क्लोसच्या विक्रमावर राहील. फिफा विश्वकप स्पर्धेत पैशांचा अक्षरश: पाऊस पडत असतो. २०२२ च्या विश्वकप स्पर्धेत फिफाने ३५०० कोटींची उलाढाल केली होती. विजेत्या अर्जेंटिना संघाला ३४४ कोटींचे बक्षीस मिळाले होते तर उपविजेत्या फ्रान्स संघाला २४५ कोटींचे बक्षीस मिळाले होते. यंदाच्या विश्वकप स्पर्धेत मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही सलामीची लढत होईल. मेक्सिको सिटीत होणा-या या सामन्यात ८३ हजार प्रेक्षकांचा यजमान संघाला पाठिंबा राहील. २० जुलै रोजी न्यू जर्सी येथील मेटलाईफ स्टेडियमवर स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. तेव्हा आता महिनाभर फुटबॉल रसिकांची चंगळ होणार आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी एकूण ६५.५ कोटी डॉलर्सची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्याला ५ कोटी डॉलर्स तर उपविजेत्याला ३.३ कोटी डॉलर्सचे बक्षीस देण्यात येईल. तिस-या क्रमांकाला २.९ कोटी तर चौथ्या क्रमांकाला २.७ कोटी डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रत्येक संघाला ०.९ कोटी डॉलर्स दिले जातील.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:57
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53

Latest news