काश्मिरातील शालेय पुस्तकात हाफिज सईदला महान म्हटले

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सरकारी शाळांच्या ग्रंथालयांसाठी खरेदी केलेल्या दोन पुस्तकांवरून यूएपीएअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या पुस्तकांमध्ये मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईद आणि फुटीरतावादी नेता मकबूल भट यांना महान व्यक्तिमत्त्वे म्हणून संबोधले आहे. पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स विंगने शनिवारी एफआयआर दाखल करून छापेमारी सुरू केली आहे.

विवादास्पद पुस्तकांपैकी एक हिलाल अहमद आणि संतोष मीना यांचे पर्सनॅलिटीज अँड लीजेंड्स ऑफ जे अ‍ॅन्ड के हे आहे. ते जम्मूच्या ओबेरॉय बुक सर्व्हिसने प्रकाशित केले आहे. दुसरे पुस्तक सुशांत गिरी यांचे ‘ग्रेट पर्सनॅलिटी ऑफ जम्मू-काश्मीर’ हे आहे. ते दिल्लीच्या अनुराग प्रकाशनने प्रकाशित केले आहे. अधिका-यांच्या मते, एका पुस्तकाच्या १२३ प्रती जम्मू, रामबन आणि उधमपूर जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या होत्या, तर दुस-या पुस्तकाच्या १२८ प्रती जम्मू आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये वाटण्यात आल्या होत्या. भाजपने याला अकॅडमिक जिहाद संबोधत पुस्तकांवर बंदी घालण्याची आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपने मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याकडे शिक्षणमंत्र्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली.

फुटीरतावाद्यांबद्दल काय?
मकबूल भट (१८ फेब्रुवारी १९३८-११ फेब्रुवारी १९८४) जम्मू-काश्मीरमधील एक फुटीरतावादी नेता आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे सह-संस्थापक होते. दोन खून प्रकरणांमध्ये दोषी ठरवल्यानंतर त्यांना ११ फेब्रुवारी १९८४ रोजी नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती. मकबूल भट (१८ फेब्रुवारी १९३८-११ फेब्रुवारी १९८४) जम्मू-काश्मीरमधील एक फुटीरतावादी नेता आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे सह-संस्थापक होते. दोन खून प्रकरणांमध्ये दोषी ठरवल्यानंतर त्यांना ११ फेब्रुवारी १९८४ रोजी नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती.

मीरवाइज मुहम्मद उमर फारूक
सैयद अली शाह गिलानी (जन्म: २९ सप्टेंबर १९२९) जम्मू-काश्मीरचे एक फुटीरतावादी नेते होते. ते आधी जमात-ए-इस्लामी काश्मीरचे सदस्य होते, परंतु नंतर त्यांनी तहरीक-ए-हुर्रियत नावाचा स्वत:चा पक्ष स्थापन केला. ते फुटीरतावादी पक्षांच्या ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स या संघटनेचे अध्यक्षही होते. याव्यतिरिक्त, ते सोपोर विधानसभा मतदारसंघातून आमदारदेखील होते.

सैय्यद अली शाह गिलानी
जम्मू-काश्मीरचे एक फुटीरतावादी नेते होते. ते आधी जमात-ए-इस्लामी काश्मीरचे सदस्य होते, परंतु नंतर त्यांनी तहरीक-ए-हुर्रियत नावाचा स्वत:चा पक्ष स्थापन केला. ते फुटीरतावादी पक्षांच्या ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स या संघटनेचे अध्यक्षही होते. याव्यतिरिक्त, ते सोपोर विधानसभा मतदारसंघातून आमदारदेखील होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Hatta News|हट्टाकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली!;२.४० कोटींच्या नव्या बसस्थानकाचे भूमिपूजन
07:13
Video thumbnail
Latur Police Action|लातूर पोलिसांची धडाकेबाज ॲक्शन; आरोपींची गंजगोलाईत धिंड
02:08
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत पहिली वार्षिक सभा; राजकीय हालचालींना वेग
04:26
Video thumbnail
निलंग्यात सावकारांचा नंगा नाच! शेतकऱ्यांचे अपहरण करून मारहाण?अर्धं गाव रिकामं... नेमकं काय घडतंय?
09:40
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21
Video thumbnail
Nanded|अपमानाचा बदला घेण्यासाठी व्यापाऱ्याची लूट; LCBचा मोठा खुलासा!
01:59
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातील पाणी डिसेंबरपर्यंत पुरेल – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
03:16
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाचा 'लपंडाव'; शेतकरी हवालदिल
03:08
Video thumbnail
Latur|ढोर सांगवीतील दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
01:09
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
32:11
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07

Latest news