इस्लामाबाद : पाकिस्तानमधून भारतात दहशतवादी कृत्ये करणा-या लश्कर ए तोयबाचा म्होरक्या सईदने काश्मिरमध्ये १० हजार दहशतवादी पाठवले होते, असा एक व्हीडीओ समोर आला आहे. लश्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदबद्दल बोलताना नसीर मदनी जाहीर कार्यक्रमात सांगितले की, लश्करचे दहशतवादी काश्मिरमध्ये घुसवले होते.
१४ ऑगस्ट रोजीचा नसीर मदनीचा हा व्हीडीओ आहे. बहावलनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना नसीर मदनी म्हणाला की, लश्करच्या दहशतवाद्यांनी काश्मिरमध्ये घुसखोरी केली होती आणि हाफिज सईदने १० हजार दहशतवादी पाठवले होते. जो व्हीडीओ समोर आला आहे, त्यात नसीर मदनी लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचे कौतुक करत आहे. “ऐका, याच हाफिज सईदने बळी दिला. तो आज तुरुंगात आहे. तो पाकिस्तानमधील पहिला असा कैदी असेल, ज्याच्याबद्दल साक्ष देणारा कोणी नव्हता. त्याला शिक्षा दिली गेली असे नसीर म्हणतो. त्याला फक्त शिक्षा या कारणासाठी दिली की, त्याने दहा हजार मुले काश्मिरसाठी, देशाच्या बलिदानासाठी दिले. पण, त्याला शिक्षा देऊन बनारसच्या ठगांनी तुरुंगात ठेवले आहे. तो आजही गप्प आहे असे नसीर म्हणताना दिसत आहे.
















