Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात उष्णतेचा इशारा;  विदर्भात तापमान ४४ अंश पार

महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा;  विदर्भात तापमान ४४ अंश पार

अनेक जिल्ह्यांत शाळा-कॉलेजला सुटी

 मुंबई : प्रतिनिधी
 राज्यात सध्या तापमान खूप जास्त वाढताना दिसत आहे. घराबाहेर पडल्यावर घामाच्या धारा लागतात. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात झाली आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा  देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कडक उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजला सुटी देण्यात आली आहे.
 विदर्भात तापमानाचा पारा वाढतच आहे. वाढते तापमान आणि उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज नागपुरात शाळा-कॉलेजला सुटी असणार आहे. विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमरावतीत सर्वाधिक ४४.४ अंश तापमान
विदर्भात सर्वांत जास्त तापमान आहे. अमरावतीत तर ४४.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सियसपेक्षाही जास्त आहे. अकोला हा तर जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुस-या क्रमांकावर होता. दरम्यान, काल अकोल्याच्या तापमानात किंचित घट झाली होती. मात्र, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, वाशिम आणि गडचिरोलीच्या तापमानात वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR