इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक अत्याचाराचा प्रचार करणा-या जाहिराती त्वरित थांबवा

नवी दिल्ली : इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला खतपाणी घालणा-या जाहिराती दाखवल्या जात असल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या प्रकरणी मेटा कंपनीला नोटीस बजावली असून, अशा जाहिराती आणि मजकूर तातडीने ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या गंभीर प्रकरणावर ७ दिवसांत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देशही सरकारने कंपनीला दिले आहेत.

केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरील ज्या जाहिराती युजर्सना बाल लैंगिक शोषणाचा मजकूर असलेल्या बा प्लॅटफॉर्मवर घेऊन जातात, त्या सर्व जाहिरातींवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमिक ऍम्प्लिफिकेशनमुळे अधिक लोकांपर्यंत पोहोचत असल्याचा संशय आहे. सरकारने या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेतली असून मेटाला यात तात्काळ सुधारणा करण्यास सांगितले आहे.

तपासातून प्रकार उघड
हा संपूर्ण प्रकार ‘बीबीसी आय’ या शोधपत्रकारिता करणा-या टीमच्या एका तपासातून समोर आला आहे. बीबीसीने भारतातील इन्स्टाग्रामवर अशा तब्बल ३० वेगवेगळ्या जाहिराती शोधून काढल्या, ज्या थेट बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत होत्या. या जाहिरातींमध्ये रेप व्हीडीओ, चाईल्ड व्हीडओ यांसारख्या शब्दांचा सर्रास वापर करण्यात आला होता. या जाहिरातींवर क्लिक केल्यास युजर्स थेट टेलिग्राम चॅनेल्सवर पोहोचत होते, जिथे हा आक्षेपार्ह मजकूर विकला जात होता. विशेष म्हणजे, बीबीसीने जेव्हा यातील एका जाहिरातीबाबत इन्स्टाग्रामकडे तक्रार केली, तेव्हा या जाहिरातीमुळे आमच्या कम्युनिटी गाइडलाईन्सचे उल्लंघन होत नाही असे अजब उत्तर सुरुवातीला इन्स्टाग्रामकडून देण्यात आले होते.

आम्ही गुन्हेगारांशी लढतोय
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि सरकारने कडक भूमिका घेतल्यानंतर मेटाने अनेक जाहिराती हटवल्या असून संबंधित अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “बाल लैंगिक शोषणाचा मजकूर किंवा जाहिराती पसरवणा-यांविरुद्ध आमचे झिरो टॉलरन्स धोरण आहे. अशा गोष्टी शोधण्यासाठी आम्ही प्रगत अक तंत्रज्ञानाचा वापर करतो. परंतु, आमच्या ३.५ अब्ज युजर्सच्या गर्दीत लपून आमची यंत्रणा चकवण्याचा प्रयत्न करणा-या गुन्हेगारांशी आमची सतत लढाई सुरू असते. आमची तज्ज्ञ टीम अशा समाजकंटकांचा शोध घेण्यासाठी, लिंक ब्लॉक करण्यासाठी आणि इतर कंपन्यांसोबत माहिती शेअर करण्यासाठी सातत्याने काम करत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00

Latest news