35.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रसातारच्या बदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभा

सातारच्या बदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभा

मुंबई : लोकसभेची सातारची हक्काची जागा उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीसाठी भाजपला सोडल्यानंतर अजित पवार गटाच्या वाट्याला राज्यसभेची जागा मिळणार आहे. तसे आश्वासन भाजपने दिल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली.

अजित पवार गटाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. गोयल भाजपकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. गोयल जून २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले आहेत. जर गोयल विजयी झाले तर ते राज्यसभेचा राजीनामा देतील आणि त्यांच्या राज्यसभा खासदारकीची शिल्लक असलेली चार वर्षे अजित पवार गटाच्या उमेदवाराला मिळतील; पण गोयल यांचा पराभव झाला तर अजित पवार गटाला राज्यसभा कशी मिळणार, याबाबत स्पष्टता नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR