पासपोर्ट रँकिंगमधून भारत पहिल्या १०० देशांमधून बाहेर

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट हे नागरिकत्व सिद्ध करणारे दस्तऐवज मानलं जाऊ शकत नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यावरून वाद-विवाद सुरू असून अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चर्चा सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताची पासपोर्टच्या रँकिंगमध्ये घसरण झाली असून पहिल्या १०० देशांच्या यादीतून भारत बाहेर गेला आहे.

ग्लोबल सिटिझन सोल्युशन्सद्वारे प्रकाशित (पारपत्र निर्देशांक) एक अहवाल नुकताच समोर आला आहे. ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या २०२६ च्या आकडेवारीनुसार, भारतीय पासपोर्ट १२५ व्या स्थानावर गेला आहे. या अहवालानुसार, भारताची पासपोर्ट रँकिंगमध्ये घसरण झाली असून भारत आता १२५ व्या स्थानावर गेला आहे. तसेच पासपोर्ट रँकिंगमध्ये युरोपचा दबदबा कायम असल्याचे दिसून आले आहे. २०२५ मधील रँकिंगच्या तुलनेत भारताची आता एका स्थानाने घसरण झाली आहे. या अहवालानुसार, नामिबिया भारताच्या पुढे म्हणजे १२४ व्या स्थानावर, तर अझरबैजान भारताच्या मागे म्हणजे १२६ व्या स्थानावर आहे. दरम्यान, ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या अहवालानुसार, १९७ देशांच्या यादीत भारताला १२५ वं स्थान मिळालं. तसेच २०२५ मध्ये भारत १२४ व्या स्थानावर होता. मागील वर्षाचा विचार केल्यास या वर्षी भारताची घसरण झाली असली तरी २०२१ मधील १२७ व्या स्थानाच्या तुलनेत भारताची काहीसी सुधारणा झाली आहे.

आता केवळ २६ देशांमध्ये ‘व्हिसा’ मुक्त
अहवालानुसार, भारतीय पासपोर्टद्वारे २६ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. भारतीय पासपोर्टधारक हे भूतान, जमैका, नेपाळ, पॅलेस्टाईन, ट्युनिशिया, अंगोला या सारख्या देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात. किंवा तिथे पोहोचल्यावर व्हिसा (व्हिसा ऑन अरायव्हल) मिळवू शकतात. तसेच अमेरिका, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स, चीन, संयुक्त अरब अमिराती यांसारख्या ८८ देशांना भेट देण्यासाठी भारतीय नागरिकांना अजूनही व्हिसाची आवश्यकता असते.

पहिल्या १० क्रमांकांवर कोणते देश?
१. स्वीडन
२. स्वित्झर्लंड
३. फिनलंड
४. जर्मनी
५. नेदरलँड्स
६. डेन्मार्क
७. आयर्लंड
८. युनायटेड किंगडम
९. नॉर्वे
१०. सिंगापूर

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00

Latest news