राहुल गांधींना पंतप्रधान करा

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान होणे ही ऐतिहासिक गरज असल्याचे सांगत तेलंगणातील जनतेला त्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याचे श्रेय सोनिया गांधी यांना जात असल्याने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मार्ग असल्याचेही त्यांनी म्हटले.

मिदजिल मंडल येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले की, सोनिया गांधी यांच्यावर विश्वास ठेवा. जनतेच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस २०३४ पर्यंत सत्तेत राहील. यासाठी राहुल गांधी यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाला जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रेवंत रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस)वर जोरदार टीका केली. केसीआर यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत तेलंगणात कुशासन झाले, असा आरोप त्यांनी केला.

मागील सरकारने राज्यावर ८ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जाचा बोजा टाकला, तर केसीआर यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली, असा आरोपही त्यांनी केला. तसेच सत्तेत पुनरागमनाची इच्छा व्यक्त करणारे केसीआर विधानसभा कामकाजापासून मात्र दूर राहत असल्याची टीकाही रेवंत रेड्डी यांनी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16

Latest news