35.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यात ६० ठिकाणी सामूहिक गदापूजन

सोलापूर जिल्ह्यात ६० ठिकाणी सामूहिक गदापूजन

सोलापूर : श्रीहनुमान जयंतीच्या निमित्ताने गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे, याउद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात ६० ठिकाणी सामूहिक गदापूजन करण्यातआले. यावेळी शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, गदापूजन विधी, श्रीहनुमानाची आरती, मारुतिस्तोत्र, श्रीहनुमान चालीसा, तसेच श्री हनुमते नम: हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.

या गदापूजनामागील भूमिका स्पष्ट करतांना हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे म्हणाले की, युगानुयुगे मारुतीराया्रचे शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते ती त्यांची गदा ! याच दैवी गदेने मारुतिरायांनी अनेक बलाढ्य राक्षसांचा संहार करून प्रभु श्री रामचंद्रांच्या रामराज्या साठी मोठे योगदान दिले. महाभारताच्या युद्धात देखील अर्जुनाच्या रथावर विराजमान होऊन पांडवांना धर्मयुद्ध जिंकण्यात दैवी सहाय्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठीही समर्थ रामदास स्वामींनी ११ मारूतींची स्थापना करून मावळ्यांकडून बलोपासना करून घेतली.

आता पुन्हा अयोध्येत ५०० वर्षांनंतर एकदा श्रीरामलला विराजमान झालेले आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची आवश्यकता आहे. हाच उद्देश ठेऊन आज श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वत्र गदापूजनाचे आयोजन केलेआहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR