32.5 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeनांदेडवंचितच्या उमेदवाराची तक्रार; ओम पोकर्णांसह इतरांवर गुन्हा

वंचितच्या उमेदवाराची तक्रार; ओम पोकर्णांसह इतरांवर गुन्हा

नांदेड : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आपल्या सभेची तयारी करतांना खिचडी वाटप करू द्या अन्यथा तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देत शिवीगाळ केल्या प्रकरणी भाजप नेते ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह इतरांविरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात आचार संहिता भंगाची कलमे जोडणे आवश्यक असतांना फक्त भारतीय दंड संहितेची कलमे जोडून गुन्ह्याचे स्वरुप बदलले असल्याचा आरोप वंचितचे उमेदवार तथा तक्रारकर्ते अ‍ॅड.अविनाश भोसीकर यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नांदेड लोकसभा उमेदवार अ‍ॅड.अविनाश विश्र्वनाथ भोसीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.१९ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांची सभा होणार होती. त्या सभेसाठी नवा मोंढा येथील मैदान आरक्षीत केले होते. दि. १८ एप्रिल रोजी अ‍ॅड. भोसीकर आणि त्यांचे अनेक कार्यकर्तेे तेथे सभेची तयारी पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा भाजप कार्यकर्ते कॉंग्रेसचे माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा आणि त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते आले. उद्या होणा-या सभेच्या ठिकाणी भाजपकडून आम्हाला खिचडी वाटप करू द्या, नाही तर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देत शिवीगाळ केली.

त्यांनी निवडणुकीच्या काळात असे करणे चुकीचे असून त्यांच्या बोलण्यामुळे आमची मने दु:खावले आहेत, असे नमुद करून अ‍ॅड भोसीकर यांनी तक्रार दिली. शिवाजीनगर पोलीसांनी दि. २० एप्रिल रोजी दुपारी १.२७ वाजता स्टेशन डायरी नोंद क्रमांक ८ नुसार ओमप्रकाश पोकर्णा आणि इतरांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४, ५०६ आणि ३४ नुसार अ दखल पात्र गुन्हा क्रमांक १४९/२०२४ दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे यांच्याकडे देण्यात आला
आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR