रेल्वे कोचला भीषण आग

नांदेड : प्रतिनिधी
रेल्वे प्लॅटफॉर्मपावून अवध्या काही अंतरावर उभ्या असलेल्या एका कोचला अचानक आग लागली. अवघ्या काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले होते. सदर घटना नांदेड येथील हुजूर साहेब रेल्वे स्थानकावर दि. २१ मे सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे काहीवेळ धावपळ उडाली. मात्र सुदैवाने हा कोच रिकामा होता, यामुळे मोठी दुघटना टळला.

नांदेड येथील हुजूर साहेब रेल्वे स्थानकाच्या बाजूला अतिरिक्त वा दुरूस्तीसाठी स्टेबल लाईनवर असे कोच ठेवले जातात. दि. २१ मे रोजी सकाळच्या सुमारास प्लॅटफॉर्म लाईनपासून काही अंतरावर उभ्या असलेल्या रिकाम्या रेल्वे कोचला अचानक आग लागली. उष्णतेमुळे अवघ्या काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले. तेव्हा काहीवेळ धावपळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने हालचाल करत अग्निशमन व संबंधित यंत्रणांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. यामुळे घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवाशांना दुखापत झालेली नाही. आग लागलेला कोच रिकामा असल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून पुढील तपास सुरू आहे. रेल्वे स्थानक परिसरातील साईड ट्रकवर रिकामे रेल्वे कोच लावले जातात. या ट्रकला स्टेबल लाईन असे म्हणतात. या ट्रॅकवर लावण्यात आलेल्या रिकाम्या कोचला आग लागली होती.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56

Latest news