28.8 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeधाराशिवप्रेमविवाह झालेल्या नवविवाहितेचा खून

प्रेमविवाह झालेल्या नवविवाहितेचा खून

भूम : प्रतिनिधी
आई-वडीलांचा विरोधात असतानाही प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा सासरच्या मंडळींनी भोकसून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. ही घटना भूम तालुक्यातील ईराचीवाडी येथे दि. ३ मार्च रोजी सायंकाळी घडली. या खून प्रकरणी पोलिसांनी पती, सासू, पतीची अल्पवयीन प्रेमिका या तीघांच्या विरोधात भूम पोलीस ठाण्यात सोमवारी दि. ४ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पुणे येथील मनोहर वसंत पासलकर यांची मुलगी पौर्णिमा पासलकर (वय १८) हिने ईराचीवाडी ता. भूम येथील सूरज लहू तोरकड याच्याशी जानेवारी २०२४ मध्ये पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. दोन महिन्यापूर्वी एकीशी म्हणजे पौर्णिमा हिच्याशी प्रेमविवाह झालेला असताना राहुल तोरकड याचे शेजारी राहणा-या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. पौर्णिमाचा पती राहुल तोरकड, सासू मनिषा तोरकड, पतीची अल्पवयीन पे्रमिका या तीघांनी दि. ३ मार्च रोजी सायंकाळी तीक्ष्ण हत्याराने भोकसून पौर्णिमाचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.

त्यानंतर तीचे शवविच्छेदन करण्यासाठी तीचा मृतदेह ईट येथील सरकारी दवाखान्यात दाखल केला. या प्रकरणी पौर्णिमाचे वडील मनोहर पासलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात आरोपी पती सुरज लहु तोरकड, सासू मनिषा लहु तोरकड व सुरज तोरकड याची अल्पवयीन प्रेमिका हिच्या विरोधात दि. ४ मार्च रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूमचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक शशिकांत पवार या घटनेचा तपास करीत आहेत. या गुन्ह्यात पोलीसांनी सासू मनिषा तोरकड यांनी अटक केली असून अन्य आरोपी फरार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR