नाशिक शहर वा-यावर सोडलंय

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत ५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकारावर माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

खड्डयांमुळे गेलेले जीव हे प्रशासन आणि महापालिकेच्या हलगर्जीमुळेच गेल्याचा थेट आरोप भुजबळ यांनी केला. एका मृत्यूसाठी १० लाख रुपयांची मदत दिली गेली आहे, तशीच मदत इतर मृतांच्या कुटुंबीयांनाही मिळाली पाहिजे. पैशांनी जीव परत येत नाही, पण ती मदत महत्त्वाची आहे. नाशिकची अवस्था अत्यंत वाईट झाली असून वाहतूक संथ झाली आहे, ट्रॅफिक जॅम होत आहे. नगरसेवक आणि महापौरही वैतागले आहेत. पाऊस उघडताच ताबडतोब खड्डे भरले पाहिजेत आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अधिकारी केवळ एसी ऑफिसमध्ये बसण्यासाठी नसतात, असे सुनावत त्यांनी अधिका-यांच्या भूमिकेवर बोट ठेवले. आयुक्त गेडाम साहेब हे अतिशय उत्कृष्ट अधिकारी आहेत. पण त्यांनी हे काम इतरांवर सोडून दिले, तर ते त्यांचे अपयश गणले जाईल. त्यांनी स्वत: अधिका-यांना सोबत घेऊन नाशिकच्या रस्त्यांवर फिरले पाहिजे.काँट्रॅक्ट दिले आणि मोकळे झाले असे चालणार नाही. ठेकेदार काय करतोय हे पाहिले पाहिजे. कुंभमेळा मंत्री (गिरीश महाजन) आणि आयुक्त गेडाम या दोघांनी यात तातडीने लक्ष घालावे. काम न करणा-या अधिका-यांवरही कारवाई झाली पाहिजे.

कुंभमेळ्याचे काम सांगून जबाबदारी झटकू नका
महापालिकेच्या अधिका-यांकडून कुंभमेळा प्राधिकरणाकडे अंगुलिनिर्देश केला जात असल्याच्या मुद्यावर भुजबळ म्हणाले मी स्वत: महापालिकेत होतो, दोन वेळा महापौर होतो. शहरात कुंभमेळा असो वा इतर काही, रस्त्याची, पाण्याची किंवा बांधकामाची अंतिम जबाबदारी महानगरपालिकेचीच असते. एक वीट जरी हलवायची असेल तर महापालिकेची परवानगी लागते. त्यामुळे हे कुंभमेळयाचे काम आहे असे सांगून आयुक्तांना जबाबदारी झटकता येणार नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22

Latest news