Homeक्रीडाक्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन

चौथ्या टप्प्यातील होता यकृताचा कर्करोग नोएडा येथील रुग्णालयात सुरू होते उपचार

अलिगढ : क्रिकेटर रिंकू सिंह यांचे वडील खानचंद सिंह (६०) यांचे शुक्रवारी सकाळी सुमारे ४.३६ वाजता निधन झाले आहे. त्यांना चौथ्या स्टेजचा लिव्हर कॅन्सर होता. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खूप बिघडली होती, त्यानंतर त्यांना ग्रेटर नोएडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती.

वडिलांची तब्येत बिघडल्याची बातमी मिळताच रिंकू सिंह मंगळवारी टीम इंडिया सोडून घरी परतले होते. त्यावेळी रिंकू संघासोबत चेन्नईमध्ये होता. त्यांना टी-२० विश्वचषकादरम्यान संघाचे सराव सत्र सोडावे लागले होते. २५ फेब्रुवारी रोजी रिंकू चेन्नईला परतला होता आणि संघासोबत सामील झाला होता. मात्र, २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सुपर-८ च्या सामन्यात तो प्लेइंग इव्हनचा भाग नव्हता. तो बदली खेळाडू म्हणून मैदानावर क्षेत्ररक्षण करत होता.

गॅस सिलिंडर वितरणाचे काम करत होते
क्रिकेटपटू रिंकूचे बालपण खूप कठीण गेले आहे. एका मुलाखतीत रिंकूने त्याच्या आयुष्याबद्दल सांगितले होते. रिंकूने सांगितले होते की त्याने टेनिस आणि लेदर बॉलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. यूपीच्या अलीगढमधील मॉडर्न स्कूलमधूनही क्रिकेट खेळला. इंटर स्कूल स्पर्धेत ३२ चेंडूंमध्ये ५४ धावांची नाबाद खेळी केली. सुरुवातीला क्लब क्रिकेट खेळण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून सरकारी स्टेडियममध्ये कार्ड बनवून सराव करत असे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR