पदासाठी, सत्तेसाठी विचारांशी तडजोड नाही

नागपूर : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना सत्ताधा-यांकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहा खासदार फोडल्यानंतर आता मिंधे गटाने काँग्रेसकडे मोर्चा वळवला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना शिंदे गटात येण्याची ऑफर मंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे वडेट्टीवार शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या सर्वत्र झळकू लागल्या. यावर आता स्वत: वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले असून हे वृत्त फेटाळून लावले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करत सत्तेसाठी आपण विचारांशी तडजोड करणार नसल्याचे म्हटले आहे. मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला की, काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणा-या अफवा पसरवण्याचे काम करतात, असे वडेट्टीवार म्हणाले. शिंदे गटात जाणार का? पक्ष प्रवेश करणार का? कोणाला भेटले का? अशा प्रकारच्या निराधार बातम्या पेरल्या जातात.

काही पत्रकारही कोणताही तथ्य नसताना असे प्रश्न विचारून मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ही पत्रकारिता नसून खोडसाळपणा आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी पत्रकारांना लगावला.

मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता
माझी भूमिका स्पष्ट आहे, मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम आहे. पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले. आज राज्यात शेतकरी, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, पायाभूत सुविधा अशा अनेक गंभीर प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. या विषयांवर सरकारने उत्तर द्यावे, अशी अपेक्षा असताना काही मंडळी मुद्दाम अफवा पसरवून आणि व्यक्तीगत बदनामी करून मूळ प्रश्न झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17
Video thumbnail
Latur|एकमतचा दणका! झोपेतले पोलीस जागे, कोयता गँगची काढली धिंड
03:54
Video thumbnail
BREAKING : संच मान्यता निकषांवरून लातूरमध्ये शिक्षक संघटना आक्रमक;शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे
04:37
Video thumbnail
2019 च्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; सरकारला कैलास पाटलांचा सवाल #marathilivenews #breakingnews
02:21
Video thumbnail
Parbhani |ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण!;तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच..
00:54

Latest news