अध्यक्षपदाच्या निवडीत कोणताही राजकीय हस्तक्षेप नको : उदय सामंत

पुणे : प्रतिनिधी
आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत कोणताही राजकीय हस्तक्षेप असणार नाही. याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळ जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आगामी १०० वे साहित्य संमेलन हे केवळ इव्हेंट होणार नाही तर मराठी भाषा, परंपरा आणि संस्कृती याचे जतन आणि विस्तार करणारे असेल असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषा मंत्री सामंत यांची महाराष्ट्र साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांबरोबर चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवी दिल्ली आणि सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी शासनाने ३ कोटींचा निधी दिला होता मात्र १०० व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी ५ कोटींचा निधी दिला जाणार आहे त्यातील एक कोटीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.मात्र पुढील वर्षापासून होर्णा­या संमेलनासाठी २ कोटीचा निधी दिला जाणार आहे. १०० व्या संमेलनाच्या अगोदर विविध ठिकाणी ९९ संमेलन आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी ५ कोटींचा निधी दिला जाणार आहे त्याचप्रमाणे परदेशातील १२ देशांत होणा-या संमेलनांसाठी २ कोटी आणि युवा साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण १३ विद्यापीठांत संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे याखेरीज १०० व्या साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्या स्वतंत्र दालनासाठी ५० लाख निधी देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

येत्या ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘माझी मराठी… अभिजात मराठी ’ हा उपक्रम राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये राबविण्यात येणार आहे असे नमूद करून ते म्हणाले, मराठी साहित्य पुढे नेण्यासाठी आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यासाठी विविध उपक्रम राज्याच्या विविध भागात राबविण्यात येणार आहेत त्याचा हा एक भाग असणार आहे याबरोबर ग्रामीण भागातील साहित्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. बोली भाषा पुढील पिढीपर्यंत पोचावी आणि भाषेचा अधिक व्यापक प्रमाणावर विस्तार व्हावा हा त्यामागचा उद्देश असणार आहे तसेच नव्याने मराठी भाषा अनुवाद समिती तयार करण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

पुण्यातील १०० व्या संमेलनापूर्वी आयोजन करण्यात येणा-या ९९ व्या साहित्य संमेलनाचा प्रारंभ येत्या १४ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. यामध्ये विविध घटकांसाठी संमेलन होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01

Latest news