आता सोन्याप्रमाणे चांदी तारण कर्ज मिळणार

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँके(आरबीआय)ने सोन्याप्रमाणे चांदीवर देखील कर्ज काढण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच तुमच्याकडे चांदीचे दागिणे किंवा नाणी असतील तर तुम्ही त्यावर बँक किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊ शकता. आरबीआयने यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डायरेक्शन्स २०२५ नुसार हे नियम लागू केले आहेत. सोने आणि चांदीचे दागिने तारण ठेवण्यासंदर्भातील नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत.

कर्ज घेणा-या व्यक्तीच्या उपस्थितीत चांदीची तपासणी केली जाईल. बँक मूल्यांकनाची एक प्रमाणित प्रत देईल. कर्ज करारनाम्यात सर्व फी, लिलाव प्रक्रिया, परतफेड याचा उल्लेख असेल. सर्व कागदपत्रं स्थानिक भाषेत किंवा ग्राहक ज्या भाषेला प्राधान्य देईल त्या भाषेत असतील. तारण ठेवलेली चांदी किंवा सोने सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवली जाईल.

आरबीआयच्या नियमानुसार कर्जाची परतफेड केल्यानंतर सात दिवसात बँक ग्राहकाला सोने आणि चांदीचे दागिने परत देईल. बँकेच्या चुकीने उशीर झाल्यास ५००० रुपये प्रतिदिन दंडानुसार ग्राहकांना परतावा देईल. जर एखादा कर्जदार कर्जाची परतफेड करू शकला नाही तर त्याच्या सोने किंवा चांदीचा लिलाव केला जाईल. बँक पहिल्यांदा ग्राहकाला नोटीस देईल. जर ग्राहकाचा संपर्क होऊ शकला नाही तर सार्वजनिक नोटीस एक महिन्यासाठी केले जाईल. लिलावाची राखीव किंमत सध्याच्या किंमतीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी नसेल. जर, दोनवेळा लिलाव होऊ शकला नाही तर ती मर्यादा ८५ टक्क्यांवर आणली जाईल. जर एखाद्या ग्राहकाने कर्जाची परतफेड केल्यानंतर सोने आणि दागिने परत नेले नाहीत. तर, दोन वर्षानंतर बँक त्याला अनक्लेम्ड कोलॅटरल जाहीर करेल.

चांदीवर कर्ज कोण देणार?
व्यापारी बँकांसह स्मॉल फायनान्स आणि प्रादेशिक ग्रामीण बँका, अर्बन आणि ग्रामीण को ऑपरेटिव्ह बँक, एबीएफसी आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या कर्ज सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर कर्ज देऊ शकतात. आरबीआयने स्पष्ट केल्यानुसार कर्ज केवळ दागिने, ज्वेलरी किंवा नाण्यांच्या रुपात असलेल्या चांदी किंवा सोन्यावर दिले जाईल. गोल्ड ईटीएफ किंवा म्युच्युअल फंड यूनिटसवर कर्ज दिले जाणार नाही.

कोणते दागिने तारण ठेवता येणार?
सोन्याचे दागिने १ किलोपर्यंत तारण ठेवता येऊ शकतात. तर, चांदीचे दागिने १० किलोपर्यंत तारण ठेवता येऊ शकतात. सोन्याची नाणी ५० ग्रॅम पर्यंत तर चांदीची नाणी ५०० ग्रॅमपर्यंत तारण ठेवता येऊ शकतात. या मर्यादेपेक्षा अधिक वजनांच्या दागिन्यावर कर्ज देता येणार नाही.

कर्ज किती मिळणार?
आरबीआयने लोन टू वॅल्यू निश्चित केलेली आहे. अडीच लाखांपर्यंत ८५ टक्के, अडीच लाख ते ५ लाख रुपयांपर्यत ८० टक्के, ५ लाखांच्या वरील कर्जासाठी ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. म्हणजेच, तुमच्याकडे १ लाख रुपयांची चांदी असेल तर ८५००० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. सोने आणि चांदीची किंमत निश्चित करण्यासाठी बँक किंवा एनबीएफसी गेल्या ३० दिवसांतील सरासरी क्लोजिंग किंमतीला आधार मानतील. ही किमंत आयबीजेए किंवा मान्यताप्राप्त कमोडिटी एक्सचेंजने जारी केलेल्या दरावर आधारित असेल. दागिन्यात असलेल्या इतर स्टोन किंवा मेटलचे मूल्यांकन जोडले जाणार नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news