निम्न दुधनाच्या जलसाठ्यात केवळ १ टक्का वाढ

सेलू : हवामान खात्याने दिलेल्या इशा-याप्रमाणे सेलू शहर आणि परिसरात गेल्या २४ तासांत ९६.३० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हा पाऊस अतिवृष्टीमध्ये मोडल्या जातो. मात्र अद्यापपर्यंत पावसाने वार्षिक सरासरी गाठलेली नाही. या पावसामुळे सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या जलसाठ्यात केवळ १ टक्काच वाढ झाली आहे. सद्यस्थितीत निम्न दुधना प्रकल्पाच्या जलसाठ्यात २३.५१ उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे तालुक्यावरील दुष्काळाचे सावट अद्यापही संपलेले नाही. परभणी जिल्ह्यात गुरुवारी रेड अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा दिलेला होता.

त्यानुसार जिल्ह्यातील सेलू शहर आणि तालुक्यात मागील २४ तासांत दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. सेलू शहरासह ग्रामीण भागात देखील हा पाऊस सुरू होता. त्यामुळे थोडाफार का असेना मात्र शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतकामांना वेग आला आहे. पावसाने दडी मारल्याने कोमेजू लागलेल्या पिकांना जिवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये आशा निर्माण झाली आहे.

निम्न दुधनातील पाणीसाठा लक्षात घेता या ठिकाणचे पिण्याचे पाणी आरक्षित केलेले आहे. मात्र सिंचनाकरिता देखील प्रकल्पातील पाण्याचा वापर होतो. जून आणि जुलै ही दोन महिने संपून गेलेली आहेत तरी अद्यापपर्यंत पुरेसा पाऊस झालेला नाही. मात्र भविष्यात शेतीकरिता आवश्यक असलेला पाऊस निश्चितच पडेल अशी अपेक्षा आहे. आजपर्यंत जो पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे येत्या वर्षातील पिण्याचे व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न अद्यापपर्यंत मिटलेला नाही. त्यामुळे दुष्काळाचे सावट कमी झालेले नाही. येत्या महिन्यात हवा तेवढा पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच पाणीप्रश्न सुटू शकतो.

निम्न दुधनात २३.५१ टक्के जिवंत पाणीसाठा
सेलू शहराला पाणीपुरवठा करणा-या निम्न दुधना प्रकल्पात सध्या २३.५१ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. सदरचा पाणीसाठा सेलू शहराला पिण्याकरिता केवळ चार ते पाच महिने पुरेल एवढाच आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होण्याकरिता जालना व परतूर या भागातील पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला तरच प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होते. त्याचा लाभ सेलू शहरासह परभणी व नांदेड जिल्ह्याकरीता देखील होतो.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news