संसदेच्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा बहिष्कार

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने रविवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी काही काळासाठी प्रतीकात्मक वॉकआऊट करून निषेध नोंदवला. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांचा समावेश असलेल्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय) या पक्षाला बैठकीचे निमंत्रण दिल्याच्या निर्णयाविरोधात हा निषेध करण्यात आला.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सर्व विरोधी पक्षांनी काही मिनिटांसाठी बैठकीतून बाहेर पडत सरकारच्या निर्णयाचा निषेध केल्याचे सांगितले. लोकसभा अध्यक्षांकडे या २० कथित बंडखोर खासदारांबाबत अंतिम निर्णय प्रलंबित असताना त्यांना स्वतंत्र गट म्हणून निमंत्रण देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी सांगितले की, काँग्रेस, समाजवादी पक्ष, डीएमके, झारखंड मुक्ती मोर्चा, आम आदमी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, डावे पक्ष आणि शिवसेना यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनी या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला आहे.

अधिकृत यादीत तृणमूल काँग्रेसची खासदार संख्या २८ असल्याचे नमूद असतानाही मान्यता नसलेल्या एनसीपीआयला स्वतंत्र स्थान देण्यात आल्याचा त्यांनी आक्षेप घेतला. महुआ मोइत्रा यांनी सांगितले की, या २० कथित बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यांच्याविरोधातील अपात्रतेच्या २० याचिका अद्याप प्रलंबित आहेत. ९१ व्या घटनादुरुस्तीनंतर स्वतंत्र गटाला मान्यता देण्याची तरतूद नसताना संसदीय कामकाज मंर्त्यांनी त्यांना कोणत्या आधारावर निमंत्रण दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही या मुद्यावर सरकारवर टीका केली.

शिवसेनेच्या सहा खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीनीकरण मान्य करण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयालाही त्यांनी विरोध दर्शवला. पक्षत्याग केलेल्या सहा सदस्यांना मान्यता देण्याची कोणतीही घटनात्मक तरतूद नसल्याचा दावा करत हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news