छ. संभाजीनगर : समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेत असतो तो यावर होणा-या अपघातांमुळे मात्र आता समृद्धी महामार्ग सुरक्षितपणे वाहने चालवून वाहनचालक मोठ्या प्रमाणात वापरताना दिसत आहे. गेल्या महिनाभरात या महामार्गावर प्रवास केलेल्या कारच्या संख्येवरून हे समोर आलं आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच कार धावल्या असून अत्यंत कमी अपघात या काळात झाले आहे हे विशेष आहे.
समृद्धी महामार्गावरून दिवाळी दरम्यान विक्रमी संख्येने कार धावल्या आहेत. नागपूर ते मुंबई-पुणे आणि परतीचा प्रवास अशा प्रकारे कार प्रवाशांनी दिवाळीदरम्यान समृद्धी महामार्गाला मोठी पसंती दिली आहे. समृद्धी महामार्गावरून दिवाळी सुटीदरम्यान १८ नोव्हेंबरला तर ३० हजार ५४३ कार धावल्या. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासूव आतापर्यंत एकाच दिवशी सर्वाधिक कार धावण्याचा हा विक्रम आहे.
चाकरमान्यांनी केला प्रवास
दिवाळीत रेल्वे रिझर्वेशनची अडचण, प्रचंड महागलेला विमान प्रवास यामुळे व्यापारी आणि चाकरमान्यांनी दिवाळीत समृद्धी महामार्गाला पसंती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात १ ते २१ तारखेपर्यंत समृद्धी महामार्गावरून २ लाख ६५ हजार ८५६ कार धावल्या होत्या. मात्र, नोव्हेंबर महिन्यात या कालावधीत म्हणजे १ ते २१ नोव्हेबर दरम्यान ३ लाख ८२ हजार ४१६ कार समृद्धी महामार्गालावरून धावल्या.
१३ अपघाताता दोघांचा मृत्यू
आतापर्यंत समृद्धी महामार्गावर या महिन्यात नागपूर ते भरविर दरम्यान १३ अपघात झाले, त्यात दोघांचा मृत्यू झाला. मात्र, तुलनेत हे अपघात छोटे असल्याचे ही समोर आले आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात नागरिकांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास पसंती दिली आहे.