26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयनमाज पठण करणा-या विदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला

नमाज पठण करणा-या विदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला

अहमदाबाद: गुजरातच्या एका विद्यापीठामध्ये पाच परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे. हे विद्यार्थी उज्बेकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेतील असल्याचे सांगितले जात आहे. ते हॉस्टेलच्या परिसरात नमाज पठण करत होते. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी त्याचा विरोध केला. त्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

परदेशी विद्यार्थ्यांनी दावा केला की, बाहेरुन आलेले काही लोक अचानक हॉस्टेलच्या बिल्ंिडगमध्ये घुसले आणि जय श्रीरामच्या घोषणा देऊ लागले. हॉस्टेलमध्ये नमाज पठणाला परवानगी नाही, असे म्हणत त्यांनी विरोध करायला सुरुवात केली.

अफगाणिस्तानच्या एका विद्यार्थ्याने म्हटले की, जवळपास १० ते १५ लोक बाहेरुन आमच्या हॉस्टेलमध्ये आले. जेव्हा आम्ही नमाज पठण करत होतो तेव्हा तीन जण आमच्या हॉस्टेलच्या बिल्ंिडगमध्ये दाखल झाले. तिथल्या सुरक्षा रक्षकाला त्यांनी धक्का दिला आणि नमाज पठण करत असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. शिवाय त्यांच्या खोल्यांची तोडफोड केल्याची माहिती आहे. या घटनेमध्ये पाच दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR