33.2 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनश्वेता बच्चनने साजरा केला ५० वा वाढदिवस

श्वेता बच्चनने साजरा केला ५० वा वाढदिवस

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन बॉलिवूड पासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. शवेता आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास क्षणी श्वेताची लेक नव्या नवेली नंदाने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर करून आपल्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या तिची आई श्वेताच्या खूप जवळ असून, दोघी बॉलिवूडच्या अनेक समारंभात सोबत दिसतात.

नव्या नवेली नंदाने तिच्या आईसोबतचे लहानपणीचे दोन फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले आहेत. पहिल्यामध्ये, पहिल्या फोटोमध्ये श्वेता लहान नव्याला तिच्या हातात उचलून घेतले आहे. तर दुस-या एका फ्रेममध्ये लहान नव्या आपल्या हाताने काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असून, श्वेता तिच्याकडे पाहत आहे. हे दोन फोटो शेअर करून नव्याने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. मी तुझ्यावर प्रेम करते.

नव्या नवेली नंदाने चित्रपट उद्योगापासून दूर राहण्याचा आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असला तरी ती अनेकदा बॉलिवूडच्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि बी-टाऊनच्या आगामी पिढीतील कलाकारांसोबत हँग आउट करताना दिसते. पण आज तिच्या आईचा वाढदिवस असल्याने तिने खास पोस्ट करून श्वेताला शुभेच्छा दिल्या आहेत. नव्याच्या पोस्टला अनेक चाहत्यांनी कमेंंट्स करून श्वेताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR