34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमी हरलो तर अमेरिकेत रक्तपात : डोनाल्ड ट्रम्प

मी हरलो तर अमेरिकेत रक्तपात : डोनाल्ड ट्रम्प

वॉश्ािंग्टन- अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सभेला संबोधित करताना थेट रक्तपाताचा इशारा दिला. ते म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका होत आहेत. यावेळेस ते अध्यक्ष झाले नाहीत तर देशात मोठा रक्तपात होईल.

ओहिओमध्ये सिनेटर पदाचे उमदेवार बार्नी मोरेनो यांच्या प्रचारसभेत बोलताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. ट्रम्प ऑटो इंडस्ट्रीबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी रक्तपाताचा उल्लेख केला. ते म्हणाले की, तुम्ही ५ नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा. ही तारीख खूप महत्वाची ठरणार आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट राष्ट्रपती जो बायडेन आहेत.

जो बायडेन म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे देशाचा अपमान करत आहेत. देशाची प्रतिमा त्यांच्यामुळे खराब होत आहे. यावेळच्या निवडणुका अमेरिकेच्या लोकशाहीचे भाग्य ठरवतील. ६ जानेवारीची घटना लक्षात घेता ट्रम्प किती घातक आहेत हे लक्षात येईल.

अमेरिकेत कोण होणार विजयी?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होत आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाकडून जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. दोघांमध्ये थेट निवडणूक होईल हे जवळपास निश्चित आहेत. ७७ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प आणि ८१ वर्षीय जो बायडेन यांच्यामध्ये कोण विजयी होईल याबाबत उत्सुकता आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात वयस्कर अध्यक्षपदाचे उमेदवार समोरासमोर आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR