आरएसएसच्या जोशींनी राम मंदिराचे पालकत्व सोडले

अयोध्या : राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात मोठे उलटफेर होताना पाहायला मिळत आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये मोठ्या उलथापालथी होत आहेत. अनेक पदांचा खांदेपालट करण्यात येत आहेत. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी राम मंदिर ट्रस्ट संरक्षक (पालक) पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून भय्याजी जोशी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राम मंदिर ट्रस्टने किंवा भय्याजी जोशी यांनी या प्रकरणी कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. भय्याजी जोशी यांनी दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वोच्च नेतृत्वात काम केले आहे. राम मंदिर ट्रस्टच्या नवीन रचनेत आणि नवीन कार्यशैलीत नवीन चेह-यांना प्राधान्य दिले जात आहे. अनेक जुनी माणसे आता सक्रियपणे सहभागी नाहीत. या चर्चांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नसली तरी या बदलाबाबत संघटनात्मक आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जाणारे भय्याजी जोशी यांनी राम मंदिर ट्रस्टच्या पालक पदाचा राजीनामा दिला आहे. ट्रस्टने त्यांना या जबाबदारीतून मुक्त केले आहे. भय्याजी जोशी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे अधिकृतपणे म्हटले जात आहे. भय्याजी जोशी यांचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण एकेकाळी आरएसएस आणि भाजपा यांच्यातील सर्वांत मजबूत दुवा मानले जात होते. जोशी यांची संघटनेवर दीर्घकाळ मजबूत पकड होती. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जोशी यांचा सहभाग असे. राम मंदिर ट्रस्टच्या पदाचा राजीनामा देणे हा केवळ एक औपचारिक बदल नसून, संघटनात्मक दृष्टिकोनातूनही तो महत्त्वाचा मानला जात आहे.

पालक हे प्रशासकीय पद
श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टमधील पालक हे पद प्रशासकीय आणि संघटनात्मक समन्वयाशी संबंधित मानले जाते. या जबाबदारीमध्ये ट्रस्टच्या कार्यावर देखरेख ठेवणे, वेळोवेळी मार्गदर्शन करणे यांचा समावेश होतो. हे पद दैनंदिन प्रशासकीय कामापेक्षा वेगळे मानले जाते. संघटनात्मक स्तरावर ट्रस्टचे कामकाज अधिक बळकट करण्याच्या पार्श्वभूमीवर जोशी यांच्याकडे संरक्षक (पालक) म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. परंतु आता या पदाचा राजीनामा दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13

Latest news