ई कॉमर्स च्या ओटीपी वरून घोटाळे

नवी दिल्ली : ऍमेझॉन, फ्लिपकार्टसह प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांच्या ऑनलाइन ऑर्डर्समध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक करणा-या टोळीचा नोएडा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ७५ लाख रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर केलेली वस्तू तपासूनच घ्या असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

डीसीपी साद मियां खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारिस खान, सुनील कुमार, विजय सिंह, धर्मेंद्र आणि सूरज सिंह यांना अटक करण्यात आली आहे. तर भूपेंद्र आणि असलम उर्फ राजू खान हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ही टोळी सक्रिय होती. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांची महागडी पार्सल डिलिव्हरीसाठी बाहेर पडल्यानंतर आरोपी ती उघडत असत. त्यानंतर पार्सलमधील मूळ महागडा माल काढून त्याऐवजी स्वस्त किंवा असंबंधित वस्तू ठेवून पुन्हा पॅक केले जात होते. या प्रकारामुळे ग्राहकांसह संबंधित ई-कॉमर्स कंपन्यांनाही मोठा आर्थिक फटका बसत होता. चोरी केलेला महागडा माल आरोपी नंतर बाजारात विकून लाखो रुपयांची कमाई करत होते.

आतापर्यंत ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर महागडा ऐवज हस्तगत केला. यामध्ये प्रोटीन सप्लिमेंट्स, ब्रँडेड शूज, कपडे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मुलांसाठीची वायरलेस उपकरणे, कान आणि रक्तदाब तपासण्याची वैद्यकीय उपकरणे, स्मार्ट डिव्हाइसेस तसेच विविध ऑनलाइन कंपन्यांचे टॅग आणि पॅकिंग साहित्य यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या सर्व साहित्याची किंमत सुमारे ७५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फरार आरोपींचा शोध सुरू
चौकशीदरम्यान आरोपींनी या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड वारिस खान असल्याची कबुली दिली. टोळीतील प्रत्येक सदस्याची स्वतंत्र जबाबदारी होती. काही जण पार्सलमधील माल बदलण्याचे काम करत, तर इतर सदस्य चोरीचा माल बाजारात विकण्याची व्यवस्था पाहत होते. या प्रकरणी सेक्टर-२० पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13

Latest news