40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनशाहरूखने ‘डीयावॉल’ ची केली जाहिरात

शाहरूखने ‘डीयावॉल’ ची केली जाहिरात

मुंबई : शाहरूख खानची क्रेझ देश-विदेशात कायम आहे हे नुकतेच त्याने ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांव्दारे दाखवून दिले आहे. आता त्यांची मुलंही फिल्मी दुनियेत पाऊल ठेवत आहेत. मुलगी सुहानाने ‘द आर्चिज’ चित्रपटातून डेब्यू केला आहे. आर्यनने कपड्यांचा ब्रँड ‘डीयावॉल’ लाँच करून व्यवसायाला सुरुवात केली आहे. दरम्यान शाहरूख आणि सुहाना मोठ्या पडद्यावर ‘किंग’ या चित्रपटामधून एकत्र काम करताना पाहता येणार आहे. यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत. मात्र, या अगोदरच दोघे एका जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही जाहिरात शाहरूखच्या मोठ्या मुलाची आर्यनच्या ‘डीयावॉल’ या कपड्याच्या ब्रँडची आहे. शाहरूख खानने शुक्रवारी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हीडीओ शेअर केला आहे. हा एक व्यावसायिक व्हीडीओ आहे. यामध्ये तो सुहानासोबत दिसत आहे. यामध्ये शाहरूख खान अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. त्याचबरोबर सुहाना हातात पकडलेल्या एका काठीने ट्रेनच्या खिडकीवर डिस्नेचा लोगो काढताना दिसत आहे.

यानंतर शाहरूख आणि सुहाना एकमेकांकडे पाहून हसतात. हा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हीडीओ पोस्ट करण्यासोबतच शाहरूखने १७ मार्चला पूर्ण व्हीडीओ येणार असल्याचे सांगितले आहे. या जाहिरातीच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आर्यनने घेतल्याचे बोलले जात आहे. या जाहिरातीमुळे शाहरूखसह सुहाना आणि आर्यन हे एकत्र आले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR