37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसोलापूरसोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. अमित आळंगे

सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. अमित आळंगे

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. अमित आळंगे यांनी बाजी मारली असून त्यांच्या विधी सेवा पॅनेलचे ॲड. विनयकुमार कटारे यांनी खजिनदार म्हणून तर सहसचिव म्हणून ॲड. निदा सैफन हे विजयी झाले. तर दुसरीकडे विधी व्यासपीठ पॅनेलचे प्रमुख अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. एस. व्ही. उजळंबे यांना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यांच्या पॅनेलचे ॲड. व्ही. पी. शिंदे हे उपाध्यक्ष म्हणून तर ॲड. मनोज पामूल हे सचिव म्हणून विजयी झाले.

बार असोसिएशनच्या सहसचिव पदासाठी ॲड. उजळंबे यांच्या पॅनेलमधील ॲड. मीरा प्रसाद तर ॲड. आळंगे यांच्या विधी सेवा पॅनेलमधील ॲड. निदा सैफन यांच्यात पहिल्या फेरीपासून रस्सीखेच सुरू होती. पहिल्या फेरीत मीरा प्रसाद यांना ४४ तर निदा सैफन यांना ४२ मते होती. १५व्या फेरीअखेर मीरा प्रसाद यांना ६०९ तर निदा सैफन यांना ६२८ मते मिळाली होती. दोघींच्या मतांमध्ये अगदी काही मतांची आघाडी होती. दुसरीकडे या निवडणुकीत ॲड. राजेंद्र फताटे यांच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला. त्यांच्या पॅनेलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. दरम्यान, मावळते अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सुरेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या टिमने अतिशय अत्कृष्टपणे निवडणुकीचे कामकाज हाताळले.

पहिल्या फेरीतील १०० मतदानात ॲड. अमित आळंगे यांना ५५ तर ॲड. एस. व्ही. उजळंबे यांना ३३ मते मिळाली. दहाव्या फेरीत आळंगे यांना उजळंबे यांच्या तुलनेत १५९ मते जास्त मिळाली होती. पंधराव्या फेरीअखेर १५०० मतांची मोजणी पूर्ण झाल्यावर ॲड. आळंगे यांना ७९५ तर ॲड. उजळंबे यांना ५४८ मते मिळाली होती. पहिल्या फेरीपासूनच ॲड. आळंगे यांनी पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी कमी होऊ दिली नाही.अ‍ॅड. राजेंद्र फताटे यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला असून फताटे यांना १५२ मते मिळाली.

अध्यक्षपदासाठी ॲड. अमित आळंगे यांना ८५१ तर ॲड. उजळंबे यांना ५८१ मते मीळाली.सहसचिव पदासाठी ॲड. मीरा प्रसाद व ॲड. निदा सैफन यांच्यात चूरस पहायला मिळाली , २७ मतांनी ॲड. सैफन यांचा विजय झाला. ॲड. आळंगे यांच्या पॅनलचे तीन (अध्यक्ष, खजिनदार, सहसचिव) तर ॲड. उजळंबे यांच्या पॅनलचे दोन (उपाध्यक्ष व सचिव) उमेदवार विजयी झाले.

बार असोसिएशनचे नूतन पदाधिकारी
१) विधी सेवा पॅनलचे विजयी उमेदवार
अध्यक्ष : ॲड. अमित आळंगे (८५१)
सहसचिव : ॲड. निदा सैफन (६७७)
खजिनदार : ॲड. विनयकुमार कटारे (६४३)

२) विधी व्यासपीठ पॅनलचे विजयी उमेदवार
उपाध्यक्ष : ॲड. व्ही. पी. शिंदे (६७१)
सचिव : ॲड. मनोज पामूल (७५४)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR