स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे अडचणीत; आक्षेपार्ह मजकुराप्रकरणी महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल

मुंबई: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आणि त्याचे सहकारी सध्या कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. सोशल मीडियावर महिलांबाबत अवमानकारक, आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर प्रसारित केल्याचा ठपका ठेवत ‘महाराष्ट्र सायबर’ने प्रणित मोरेसह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

प्रणित मोरेच्या ‘लाइव्ह स्टँड-अप शो’चे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये ३७० रुपयांच्या बिर्याणीचा वाद: एका शोदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधत असताना, एका तरुणाने डेटवर गेलेल्या तरुणीवर खर्च केलेल्या ‘चिकन बिर्याणी’च्या बिलाचा उल्लेख केला. ३७० रुपये खर्च केल्यावर ते पैसे ‘वसूल’ करण्याच्या त्याच्या विधानावर शोमधील लोक आणि स्वतः प्रणित मोरेही हसताना दिसले. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. हे विधान महिलांचा अपमान करणारे आणि चुकीच्या मानसिकतेचे दर्शन घडवणारे असल्याचे म्हणत सोशल मीडियावर यावर कडक टीका झाली.

शिवाय प्रणित मोरेच्याच एका शोमध्ये डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयीन अनुभवांबद्दल बोलताना ‘कॅडेव्हर’ (शरीरदान केलेल्या मृतदेह) संदर्भात एक वादग्रस्त विधान केले होते. हे वक्तव्य वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा आणि नैतिकतेच्या विरोधात असल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सायबरने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून BNS (भारतीय न्याय संहिता) आणि IT ॲक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना समन्स बजावण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news