29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयपद्मभूषण पुरस्कार चोरून विकणारा गुन्हेगार जेरबंद

पद्मभूषण पुरस्कार चोरून विकणारा गुन्हेगार जेरबंद

नवी दिल्ली : पंजाब यूनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरु जीसी चटर्जी यांचा पद्मभूषण पुरस्कार चोरी झाला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जोडपे पुरस्कार विकण्यासाठी ज्वेलर्स शॉपमध्ये आले होते. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

श्रवण कुमार, हरि सिंह, रिंकी देवी, वेद प्रकाश आणि प्रशांत बिस्वास अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी मदनपूर खादरचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रशांत बिस्वास हा ज्वेलरी शॉप चालवतो.

मंगळवारी रिंकी देवी, वेद प्रकाश आणि हरि सिंह हे पुरस्कार विकण्यासाठी ज्वेलर्स शॉपमध्ये आले होते. ज्वेलर्स शॉप मालक दलीपने पुरस्कार घेतला नाही. तसेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, पण तोपर्यंत आरोप फरार झाले होते. त्यानंतर पोलीस अ‍ॅक्टिव मोडमध्ये आले. एका एसीपी अधिका-याच्या नेतृत्त्वामध्ये टीम स्थापन करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. यातून आरोपींना शोधण्यास मदत झाली.

तीन आरोपींची ओळख झाली होती. यात हरि सिंह, रिंकी देवी आणि प्रकाश बिस्वास यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु करण्यात आली. यात कळाले की श्रवण कुमार याने पुरस्कार चोरला होता. त्यालाही अटक करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR