34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योग‘इंटेल इंडिया’चे माजी प्रमुख अवतार सैनी यांचे निधन

‘इंटेल इंडिया’चे माजी प्रमुख अवतार सैनी यांचे निधन

मुंबई : इंटेल कंपनीचे भारतातील माजी प्रमुख अवतार सैनी यांचे निधन झाले आहे. नवी मुंबईमध्ये सायकलवरुन जात असताना एका टॅक्सीने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अवतार यांनीच इंटेलच्या पेंटियम प्रोसेसरचे डिझाईन केले होते.

बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास ते नेरुळ भागात सायकल्ािंग करत होते. यावेळी एका भरधाव टॅक्सीने मागून येत त्यांना धडक दिली. यानंतर आरोपी टॅक्सी चालकाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायकल टॅक्सीमध्ये अडकल्यामुळे सैनीदेखील टॅक्सीसोबत काही अंतर फरफटत गेले.

सैनी हे मुंबईच्या चेंबूर परिसरात एकटेच राहत होते. तीन वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही अमेरिकेत राहतात. पुढील महिन्यातच ते आपल्या मुलांना भेटणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. इंटेल इंडियाचे विद्यमान अध्यक्ष गोकुल व्ही. सुब्रमण्यम यांनी सैनींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR