33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीय‘सनातन’वरुन सुप्रीम कोर्टाने उदयनिधींना झापले

‘सनातन’वरुन सुप्रीम कोर्टाने उदयनिधींना झापले

नवी दिल्ली : सनातन धर्मावर टिप्पणी करणारे तमिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांना सुप्रीम कोर्टाने सुनावले आहे. आपण एक मंत्री आहात. तुम्ही सामान्य व्यक्ती नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचे परिणाम माहिती असणे आवश्यक आहे, असे म्हणत कोर्टाने त्यांना झापले आहे.

तुम्ही जबाबदारीच्या पदावर आहात, त्यामुळे तुम्हाला परिणामांची जाणीव असायला हवी, असे कोर्टाने उदयनिधी यांना म्हटले आहे. कोर्ट या प्रकरणी १५ मार्चला पुढील सुनावणी घेणार आहे. सनातन धर्मावर टीका केल्यानंतर उदयनिधी यांच्या विरोधात विविध राज्यात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उदयनिधी यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तक्रारी मागे घेण्यात याव्यात अशी त्यांची मागणी होती.

उदयनिधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्मावर विषारी टीका केली होती. काही आजार हे बरे होत नसतात, त्यांना पूर्ण संपवायलाच हवं. कोरोना, कर्करोग, डेंग्यु, मलेरिया अशा रोगांना आपण बरे करु शकत नाही. त्यामुळे त्यांना समूळ नष्ट करायला हवे. त्याचप्रमाणे सनातन धर्मामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. त्याला मुळातूनच नष्ट करावे लागेल, असे ते म्हणाले होते.

भाजपने उदयनिधी यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. पण, उदयनिधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. आता कोर्टात हे प्रकरण सुरु आहे. १४ मार्चला पुढील सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट याप्रकरणी काय निर्णय घेते याकडे देशाचे लक्ष असणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असल्याने हा मुद्दा तापवले जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR