31.2 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रसंभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या सभेच बॅनर फाडले

संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या सभेच बॅनर फाडले

छ. संभाजीनगर : जिल्ह्यात पुन्हा मराठा आंदोलक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या होणा-या सभेसाठी लावण्यात आलेले बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतल्याशिवाय आंदोलन केले जाऊ देत नाही. त्यामुळे आमच्या गावात देखील बॅनर लावतांना ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी अन्यथा बॅनर लावू देणार नाही असे म्हणत मराठा आंदोलकाने शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील टूनकी गावात लावण्यात आलेल्या अमित शाह यांचे बॅनर फाडण्यात आले आहे. अमित शाह यांची उद्या छत्रपती संभाजीनगर शहरातील खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होत आहे. त्यासाठी जिल्हाभरात बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान, वैजापूर तालुक्यातील टूनकी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणा-या अजय साळुंके नावच्या व्यक्तीने शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले आहेत. मराठा आरक्षणासाठी गाव बंदीचे बॅनर तुम्ही अनाधिकृत आहेत म्हणून काढता, मग आमच्या गावात लावलेले हे बॅनर कुठल्या परवानगीने लावले आहेत असे म्हणत बॅनर फाडण्यात आले आहे.

‘एक मराठा, लाख मराठा’चा घोष
वैजापूर तालुक्यातील टूनकी गावात लावण्यात आलेल्या अमित शाह यांचे बॅनर फाडण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या ५ मार्च रोजी अमित शाह हे संभाजीनगर शहरात जाहीर सभा घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR