एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ८ क्रू मेंबर्सचे निलंबन

अमृतसर : विमानाचे उड्डाण झाल्यानंतर निर्धारित वेळेत अनिवार्य घोषणा न केल्याने, एअर इंडिया एक्सप्रेसने आठ क्रू सदस्यांचे निलंबन केले आहे. तीन महिन्यांसाठी हे निलंबन करण्यात आले आहे. दुबईवरून अमृतसरला आलेल्या विमानाचे लँडिंग झाल्यानंतर ही घटना घडली होती. २ ऑगस्टला झालेल्या या घटनेमध्ये, दुबईहून अमृतसरला विमान उतरल्यानंतर क्रू सदस्यांना दोन तासांच्या आत अनिवार्य पोस्ट-फ्लाइट डिक्लेरेशन सादर करणे आवश्यक होते. मात्र, या क्रू सदस्यांकडून निर्धारित वेळेपेक्षा ३५ मिनिटांचा विलंब झाला. त्यांनी विमान उतरल्यानंतर दोन तास ३५ मिनिटांनी ही घोषणा सादर केली.

एअरलाइनच्या अनिवार्य नियमांनुसार संबंधित सर्व क्रू सदस्यांची सायकोअ‍ॅक्टिव्ह पदार्थ आणि अल्कोहोल चाचणी करण्यात आली. या सर्व चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला देण्यात आली. त्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसने संबंधित आठ क्रू सदस्यांवर तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली.

अल्कोहोल चाचणी अनिवार्य
डीजीसीएच्या नियमांनुसार, भारतातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणा-या विमानांच्या क्रू सदस्यांसाठी भारतात विमान उतरल्यानंतर निर्धारित कालावधीत पोस्ट-फ्लाइट अल्कोहोल चाचणी पूर्ण करणे अनिवार्य आहे. या नियमांचे पालन करताना कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे झालेला विलंब ग्रा धरला जात नाही.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|महापुरुषांचा आदर्श घ्या आणि ध्येय निश्चित करा! – डीवायएसपी अक्षय जाधव
04:44
Video thumbnail
Latur|अंधारात अजगराचा थरार! सेलूत सर्पमित्राने केली सुरक्षित सुटका
01:52
Video thumbnail
Latur|मुख्याध्यापक युवराज शिंदेंनी केली एकमतच्या गणरायाची आरती
02:44
Video thumbnail
Latur|हैदराबाद मुक्तिसंग्रामातील संघर्षयोद्धा राजा हरिश्चंद्र जाधवांचा पुतळा अनावरण
06:19
Video thumbnail
Nanded|आधी कचरा टाकला... मग त्याच कचऱ्याची केली स्वच्छता! नांदेड महापालिकेचा कारभार चर्चेत
01:23
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
11:55
Video thumbnail
Babasaheb Patil|खरीप पिकांच्या नुकसानीवर सरकारचा प्लॅन काय? सहकारमंत्र्यांनी दिलं उत्तर
01:37
Video thumbnail
Latur|जळकोटच्या स्वातंत्र्यसैनिकांचा निजामाविरोधातील लढा आजही इतिहासात जिवंत
02:50
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातून पाणी चोरीचा धक्कादायक प्रकार
04:05
Video thumbnail
Latur|डॉ. विजयकुमार यादव यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील श्रीगणेशाची आरती
01:39
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; हुतात्म्यांना मानाचा मुजरा
00:50
Video thumbnail
Renapur|हातभट्टीच्या अड्ड्यांवर रेणापूर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
01:46
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52

Latest news