Homeराष्ट्रीयराजकारणात ‘सिकंदर’ ठरलेला थलपती विजय घराच्या उंबरठ्यावर हरला? ऐतिहासिक विजयाच्या क्षणी पत्नी-मुलांची पाठ!

राजकारणात ‘सिकंदर’ ठरलेला थलपती विजय घराच्या उंबरठ्यावर हरला? ऐतिहासिक विजयाच्या क्षणी पत्नी-मुलांची पाठ!

चेन्नई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार थलपती विजयने (Thalapathy Vijay) अभिनयासोबतच आता राजकारणाच्या मैदानातही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर विजयच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून, विजय तमिळनाडूचा नवा ‘किंग’ म्हणून समोर आला आहे. मात्र, राजकीय यशाचे हे शिखर सर करत असताना विजयच्या वैयक्तिक आयुष्यातील एका मोठ्या पोकळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यशाचा सोहळा, पण कुटुंब गायब
विजयच्या राजकीय प्रवासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिल्या भव्य राज्यस्तरीय परिषदेत आणि त्यानंतरच्या विजयोत्सवात त्याचे कुटुंबीय कुठेच दिसले नाहीत. विशेषतः त्याची पत्नी संगीता आणि त्याची मुले या ऐतिहासिक क्षणी त्याच्यासोबत नसल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. ज्या वेळी विजय तामिळनाडूच्या जनतेला संबोधित करत होता आणि लाखो चाहते त्याच्या नावाचा जयघोष करत होते, तेव्हा त्याच्या कुटुंबाची अनुपस्थिती अनेकांना खटकली.

घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण
गेल्या काही काळापासून थलपती विजय आणि संगीता यांच्या वैयक्तिक नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. जरी विजयने यावर कधीही अधिकृत भाष्य केले नसले, तरी महत्त्वाच्या कौटुंबिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये संगीताची अनुपस्थिती या अफवांना खतपाणी घालत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, इतक्या मोठ्या विजयानंतरही पत्नी आणि मुलांनी पाठ फिरवणे हे विजयसाठी ‘वैयक्तिक पराभवा’सारखे मानले जात आहे.

चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
एकीकडे विजयचे चाहते त्याच्या राजकीय विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत, तर दुसरीकडे त्याच्या एकाकीपणाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. “तमिळनाडू जिंकणाऱ्या थलपतीने स्वतःचे घर गमावले की काय?” असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत. राजकारणात ‘किंग’ ठरलेला हा अभिनेता आपल्या वैयक्तिक आयुष्यातील हे वादळ शांत करण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR