Homeराष्ट्रीयकेवळ व्यभिचाराच्या संशयावरून घटस्फोट मंजूर होऊ शकत नाही : उच्च न्यायालय

केवळ व्यभिचाराच्या संशयावरून घटस्फोट मंजूर होऊ शकत नाही : उच्च न्यायालय

पाटणा : वृत्तसंस्था
पती असो वा पत्­नी व्यभिचाराचे केवळ मोघम आणि पुरावा नसलेले आरोप लावून घटस्फोटाची मागणी करता येणार नाही. अशा आरोपांमध्ये वेळ, ठिकाण किंवा संबंधित व्यक्तीची ओळख स्पष्ट नसेल, तर त्या आधारे घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत पाटणा उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती नानी टागिया आणि न्यायमूर्ती आलोक कुमार पांडे यांच्या खंडपीठाने पतीने घटस्फोटासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. सिवन येथील कौटुंबिक न्­यायालयाने २०१९ मध्ये पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली होती, ज्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

‘लाईव्­ह लॉ’ने दिलेल्­या वृत्तानुसार, पतीने दावा केला होता की, लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्याच्या पत्नीच्या वागण्यात बदल झाला. ती कुटुंबाला न सांगता बाहेर जात असे. पतीने असा आरोप केला होता की, १५ ऑक्टोबर २०१२ रोजी ती सकाळी ११ वाजता घराबाहेर पडली. रात्री ९ वाजता परतली. यादरम्यान त्याने पत्नीला एका अनोळखी व्यक्तीसोबत सिनेमा हॉलमधून बाहेर पडताना पाहिले होते. तसेच, लग्नापूर्वीपासूनच तिचे संबंधित व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप पतीने केला होता.

कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली होती पतीची याचिका
घटस्फोटासाठी पतीने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र यावेळी पत्नी हजर न राहिल्यामुळे ही प्रक्रिया एकतर्फी चालवण्यात आली होती. कौटुंबिक न्यायालयाने व्यभिचाराचे ठोस पुरावे नाहीत, असे स्पष्ट करत घटस्फोट देण्यास नकार दिला होता. या निकालाविरोधात पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR