35.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeराष्ट्रीयमंत्र लवकर म्हणत नसल्याने पुरोहिताला मारहाण

मंत्र लवकर म्हणत नसल्याने पुरोहिताला मारहाण

लखनऊ : लग्नाच्या मंडपातच एका पुरोहिताला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमधील हा प्रकार आहे. येथे रामपूर गढीतील क्लासिक रेस्टॉरेंट येथे मंगळवारी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी शिपाई असलेल्या सोनू जाटव याचे लग्न होते.

सात फेरे घेताना लवकर लवकर मंत्र वाचण्यासाठी सोनू पुरोहितावर दबाव आणत होता. लवकर लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती. त्याने पुरोहिताला तशा सूचना दिल्या. पण, पुरोहित काही ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे नाराज झालेल्या आणि संतापलेल्या शिपायाने पुरोहिताला बेदम मारहाण सुरु केली. विवेक शुक्ल असे पुरोहिताचे नाव आहे. पुरोतिहाला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ मध्ये आला. यावेळी सोनूने भावाला देखील मारहाण करण्यास सुरुवात केली.

यानंतर पुरोहित शुक्ल आणि त्याच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मेरठच्या रहिवाशी असलेल्या सोनू जाटवचे लग्न निगोहां रामपूरमध्ये राहणा-या ओमप्रकाश यांच्या मुलीसोबत ठरला होता. सोनूने पुरोहिताला लवकर लवकर मंत्र उच्चार करण्यास सांगितले. पुरोहिताने याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सोनूने पुरोहिताला मारहाण सुरु केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपास सुरु आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR