पावसामुळे हाहाकार उडणार

कोटा : इस्रोच्या इनसॅट-३ डीआर सॅटेलाईटने भारताच्या हवामानातील मोठा बदल समोर आणला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून देखील देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाचा जवळपास दोन तृतियांश भाग हा ढगांनी व्यापून गेला आहे. जम्मू काश्मीरपासून ते गंगा नदीच्या मैदानी प्रदेशापर्यंतचा भाग ढगांनी व्यापून टाकला आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये मान्सूनच्या ढगांनी गर्दी केली आहे. मान्सून भारतामध्ये आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काही राज्यात तर अतिवृष्टीची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून सातत्याने या निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. इस्रोच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या नव्या फोटोंमुळे मोठी खळबळ उडाली आहे. भारताचा जवळपास ६० ते ७० टक्के भाग मान्सूनच्या ढगांनी व्यापून टाकला आहे. याचाच अर्थ पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये देशातील जवळपास दोन तृतियांश भागांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

हवामान बदलाचा परिणाम
हवामान तज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठा बदल होत आहे. कधी-कधी अतिमुसळधार पाऊस होतो तर कधी-कधी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून देण्यात येणा-या सूचनांचं पालन करावे असे देखील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाकडून तब्बल २३ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, नाशिक, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49

Latest news