राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा

मुंबई : देशभरात पेपर लीकच्या घटनेमुळे विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनंतर महाराष्ट्रातदेखील एमपीएससी तसेच नीट-टीईटीचा पेपर देखील फुटला असल्याने राज्यातील शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा देण्याची मागणी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, नीट-टीईटी जी आमच्या महाराष्ट्रातील एंट्रन्स एक्झॅम आहे, जसे इकडे संसदेत पेपर लीकवर चर्चा सुरू आहे, तसे तिकडे पेपर लीकच्या घटना उघडकीस येत आहेत. आता नीट-टीईटी परीक्षेत असे दिसून आले की ज्यांना १२ वीच्या परीक्षेत ४०-५० टक्के आहेत, त्याच मुलांनी उएळ परीक्षा पास केली आहे. यावरून हे स्पष्ट होते की कोचिंग क्लासेसमध्ये पेपर लीक झाले आहेत आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनी पेपर विकत घेऊन या परीक्षा पास केल्या आहेत. सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे भाजपच्या नेत्यांच्या मुलांचे देखील नाव पुढे येत आहेत.

विद्यार्थ्यांसोबत खूप मोठा खेळ
पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, मागच्या वेळेस शिक्षकांच्यासाठी असलेल्या टीईटीचा पेपर लीक झाला होता. खूप मोठे घोटाळे महाराष्ट्रात होत आहेत. रस्त्यांवरील खड्डे वाढले आहेत. तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुश आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत खूप मोठा खेळ या सरकारने लावला आहे. इथे संसदेत आपण पेपर लीकवर चर्चा करत आहोत आणि तिथे अजूनही पेपर लीक व्हायच्या घटना उघडकीस येत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे तसेच महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

भुसे यांनी राजीनामा द्यावा : रोहित पवार
काँग्रेसच्या युवा कार्यकर्ते व पदाधिका-यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला अल्टीमेटम दिले होते. त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी पेपर लीकचा मुद्दा उचलून धरला असून एमपीएससीचा पेपर लीक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर आयोगाकडून सुद्धा दखल घेतली गेली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22

Latest news