राज्यावर एल निनोचा मोठा परिणाम होणार

मुंबई : अल निनोच्या संदर्भात आपण तयारी करत आहोत. मी माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्येच एल निनोच्या संदर्भात वाच्यता केली होती. त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केल्या जात असलेल्या उपाययोजनांबद्दलही मुख्यमंत्री बोलले.

मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामे कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात करता येतील, हाही आपला प्रयत्न आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणे कामी येत नाहीत. पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाचे छोटे साठेच कामी येतात. त्यामुळे त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपण भर दिलेला आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

चारा टंचाई टाळण्यासाठी कृषी विभागाला सूचना
प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन ही जलसंधारणाची कामे कशी पूर्ण करायची, हे आपण सांगितले आहे. चा-याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीने आपण पशुसंवर्धन विभाग आणि कृषि विभाग यांना सूचना देऊन वैरण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

…पण त्यातून मार्ग काढू
ही गोष्ट खरी आहे की, ज्या पद्धतीचे अंदाज दिले जात आहेत, त्यात अडचण मोठी असेल; पाऊस कमी पडणार आहे. त्यातून आपण मार्ग काढू. विशेषत: शेतक-यांना आम्ही सल्ला देत आहोत. राज्य सरकारकडून दिल्या जाणा-या मार्गदर्शनानुसारच जर शेतक-यांनी पेरणी केली, तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीने पेरणी केली, तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील. दुबार पेरणीची वेळ येईल असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतक-यांना केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|निटूरमध्ये भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू
01:12
Video thumbnail
Latur Farmar News|पत्नीसोबत स्वतः नांगर ओढणाऱ्या शेतकऱ्याला अखेर मिळाला बैल!
01:38
Video thumbnail
Latur -बसस्थानकात सोनसाखळी चोरणारी महिला काही तासांत जेरबंद! #marathilivenews #Latur #police
00:41
Video thumbnail
Bus Accident|उदगीर-अहमदपूर मार्गावर मोठा अपघात#marathilivenews #maharashtranews #breakingnews
01:18
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48

Latest news