सोलापूर : महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विभागाचे धीरज साळे व उजनी कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे यांची कार्यालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून उजनी धरण 100 टक्के भरले आहे पाऊस भरपूर पडत आहे तर ते अतिरिक्त पाणी वाया जाऊ न देता आष्टी तलाव त्वरित भरून घेऊन ते पाणी आष्टी उपसा सिंचन योजनेत व गेल्या 40 ते 45 वर्षापासून जो पोखरपुर खावणी सारोळ्यांचे शेतकऱ्यांचा वनवास चालू आहे.
त्यांचा कायमचा वनवास आणि दुष्काळ संपवण्यासाठी त्वरित पोखरपुर तलावात पाणी सोडावे व इतर शक्य तेवढे तलाव भरून घेऊन तसेच पाटकुल येथील चिनोबाचा तलाव भरून घेण्यात यावा अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती व निवेदनात पंढरपूर मोहोळ हायवे रस्त्यावरती सारोळे पाटी येथे रविवार दिनांक 11 8 2024 रोजी ठीक 1 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता रस्ता रोको आंदोलनापूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आंदोलनापूर्वी अधीक्षक अभियंता साळे व कार्यकारी अभियंता संभाजी माने यांच्याशी फोनवरून प्रभाकर देशमुख यांनी संपर्क केला असता त्यांनी संघटनेच्या निवेदनाच्या मागण्यांच्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसापासून आष्टी तलाव भरून घेण्याचे काम चालू आहे असे सांगितले व कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांनी प्रभाकर देशमुख यांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे.
आष्टी तलावातील पाणी पोखरापूर तलावा मध्ये सोडण्याचे नियोजन चालू केले आहे तसेच पाटकुल येथील चिनोबाचा तलाव भरून घेण्यात येईल आणी पाण्याच्या उपलब्धते नुसार इतर तलाव बंधारे भरून घेण्याची लेखी ठोस आश्वासन दिल्यामुळे रस्ता रोको आंदोलन तूर्त स्थगित ठेवण्यात आले असल्याचे पत्रकारांशी बोलताना प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. पुढे बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले की पोखरापूर येथील पाईपलाईनचे काम शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे थांबले होते परंतु ते पण काम गेल्या आठ महिन्यापूर्वी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पोखरापूर तलावा मध्ये ज्येष्ठ नेते यशवंत नरुटे बाळासाहेब भोसले आशिष आगलावे दत्ता काकडे हर्षल दळवी किरण वाघमारे गुंडीबा राऊत सारोळेचे सरपंच शाहीर सलगर शंकर पाथरूट बालाजी लादे पंजाब करंडे अण्णा शिंदे विनोद राजमाने रेवणसिधद आप्पा स्वामी विजय हांडे व इतर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले होते.
देशमुख यांनी त्या शेतकऱ्याची समजूत काढल्यामुळे काम चालू झाले व ४० ते ४५ वर्षा पासूनचा चालू असलेला वनवास पोखरापूर खवणी सारोळेच्या माझ्या शेतकऱ्यांचा दुष्काळ संपतोय याचा मला आणि शेकडो शेतकऱ्यांना मनापासून आनंद वाटतोय. यावेळी चंद्रकांत निकम नाना मोरे हरिभाऊ लोंढे तानाजी मुळे मारुती भांगे हरिभाऊ मुळे गणेश चवरे बारीकराव काळे रवी माळी किरण वसेकर हे उपस्थित होते