34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeविशेषजगातील सर्वात लहान डॉक्टर

जगातील सर्वात लहान डॉक्टर

नवी दिल्ली : अवघी ३ फूट उंची आणि केवळ १८ किलो वजन असलेल्या गणेशने नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून तो सध्या इंटर्नशिप करत आहे.

जगातील सर्वात तरूण डॉक्टर म्हणून, तो स्पर्धा करण्यास तयार असल्याचे मत गुजरातमधील भावनगर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मेहता यांनी व्यक्त केले.

गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील गोरखी गावामध्ये वास्तव्यास असलेल्या गणेशला डॉक्टरकीचे शिक्षण देण्याचे स्वप्न त्याच्या आईने देवूबेन यांनी पाहिले होते. गणेशच्या आईने पाहिलेले हे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. हालाखीची परिस्थिती असलेल्या गणेशच्या कुटुंबात त्याची आई देवूबेन या गृहिणी असून त्याचे वडील विठ्ठल हे शेतकरी आहेत. त्याला ७ बहिणी असून तो एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या सात ही बहिणींची लग्ने झाली असून, त्याच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने दहावीच्या पुढे शिक्षण घेतलेले नाही. तो एकटाच आहे, की ज्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने डॉक्टरकीचे उच्च शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

बारावीमध्ये ८७% गुण मिळवल्यानंतर त्याने मेडिकल प्रवेशसाठी प्रयत्न केले. मात्र, २०१८ मध्ये गणेशला आणि इतर दोन अपंग विद्यार्थ्यांना गुजरात सरकारने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारला होता. मात्र, त्याने हार मानली नाही.

गुजरात सरकारने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारल्यानंतर त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि विश्वस्तांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर, हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले.

सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहचल्यानंतर, अपंग व्यक्तींचे हक्क कायदा २०१६ चा हवाला देत निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूने दिला. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आदेश दिले. त्यानंतर, गणेशला भावनगर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळाला. त्यानंतर, गणेशने मागे वळून पाहिले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR