38.4 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeराष्ट्रीयसोरेन यांचा जामीन अर्ज ईडी कोर्टाने फेटाळला

सोरेन यांचा जामीन अर्ज ईडी कोर्टाने फेटाळला

रांची : वृत्तसंस्था
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या तात्पुरत्या जामिनावर शनिवारी ईडी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. हेमंत सोरेन यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, त्यांचे चुलते राजाराम सोरेन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या क्रियाकर्मासाठी १३ दिवसांचा जामीन द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु ईडी कोर्टाने हेमंत सोरेन यांना तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला.

जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. सध्या ते होटवार जेलमध्ये आहेत. या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय सुरक्षित ठेवला. जामिनाच्या याचिकेत म्हटले होते की, चुलते राजाराम सोरेन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना १३ दिवसांचा तात्पुरता जामीन मिळावा, अशी मागणी केली होती. यापूर्वी हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. २४ एप्रिल रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले होते की, ईडीच्या अटकेविरोधातील याचिकेवर हायकोर्ट निर्णय देत नाही. उच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR