28.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रसध्याच्या राजकारणाची स्थिती अत्यंत वाईट

सध्याच्या राजकारणाची स्थिती अत्यंत वाईट

अभिनेते महेश मांजरेकर, आयडॉलॉजी राहिली नाही, मत कोणाला देऊ, हा प्रश्न

पुणे : प्रतिनिधी
सध्या राजकारणाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. तुम्हाला देश चालवायचा असतो. पण तुमची तेवढी पात्रता आहे का, राजकीय लोक मंत्री होतात. त्यांची पात्रता किमान बारावी पास तरी करायला हवी. सरकारमध्ये एखाद्या नेत्याची क्रीडामंत्री म्हणू निवड करायची असेल तर किमान एखादा खेळाडूचा विचार व्हावा आणि एखाद्या नेत्याला शिक्षणमंत्री करायचे असेल तर शिक्षकाचा विचार झाला पाहिजे. परंतु तसा विचार होतो का, असा प्रश्न उपस्थित होतो. खरोखरच तसे झाले तर ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणाबद्दल बोलताना नाराजी व्यक्त केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यावर शनिवारी महेश मांजरेकर बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महेश मांजरेकर म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाने रुची घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रश्न विचारत नाही. अ्ननेकांनी राजकारणात यायला हवे, अशे मला खूप वाटते. जयललिता, एन. टी. रामारावपासून अनेकांनी दोन्हीकडे चांगले काम केले. राजकीय नेत्यांनाही वाटते की अभिनेत्यांनी राजकारणात यावे. पण राजकारणी हे डिग्री घेऊन येत नाहीत.

मुळात जे संवेदनशील आहेत, त्यांनीच राजकारणात यावे. एखाद्या कार्यालयात शिपायाची जागा आहे, त्यालाही बारावीची पात्रता लागते. जो देश चालवतो, तिथे निदान बारावी पास तरी हवा. तुम्ही देश चालविणार आहात. शिपायाकडून अपेक्षा करता की त्याने बारावी पास असावा. एवढा मोठा देश आहे. तुम्ही जिथे तिथे नियुक्त्या करता. मग एखाद्या डॉक्टराला आरोग्यमंत्री करा ना, एखादा शिक्षक असेल, तर त्याला शिक्षण मंत्री करा, आज ज्याने बॅट उचलली नाही, तो क्रीडा मंत्री असतो. हे एक मॉडेल म्हणून करायला काहीच हरकत नाही. आज आयडॉलॉजी राहिलेली नाही. मला कोणाला मत द्याचे असेल तर कोणाला देऊ, हा प्रश्न आहे, कोणी कुठेही आहे, सर्व कन्फ्यूजन आहे, असेही मांजरेकर म्हणाले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR