37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयगँगस्टर काला आणि लेडी डॉनच्या लग्नात स्वॉटसह हजारो पोलिस तैनात

गँगस्टर काला आणि लेडी डॉनच्या लग्नात स्वॉटसह हजारो पोलिस तैनात

नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ ​​काला जथेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी उर्फ ​​मॅडम मिंज यांचे उद्या, म्हणजेच १२ मार्च रोजी दिल्लीतील द्वारका भागात लग्न होणार आहे. द्वारका येथील संतोष गार्डनमध्ये हा सोहळा पार पडेल. या लग्नासाठी गँगस्टर काला जथेडीला फक्त ६ तासांचा वेळ मिळाला आहे. ६ तासांनंतर जथेडीला परत तिहार तुरुंगात नेले जाईल. दरम्यान, या दोघांच्या लग्नात पोलिसांचा कडक पहारा असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वॉट कमांडो आणि हायटेक शस्त्रांसह २५० पोलिसांसमोर लग्नाचे विधी पूर्ण केले जातील. तिहार जेल ते संतोष मॅरेज गार्डनमध्ये सुमारे १२ किलोमीटरचे अंतर आहे. लग्नासाठी तथेडीला कडेकोट बंदोबस्तात तिहारमधून संतोष गार्डनमध्ये नेण्यात येईल. सकाळी १० वाजता जथेडी लग्नात पोहचेल आणि ४ वाजता त्याला परत तिहारमध्ये नेण्यात येईल.

साध्या कपड्यात पोलिस तैनात
जथेडीच्या लग्नात तैनात असलेले पोलिस सूटा-बूटात पहारा देतील. यावेळी कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पोलिसांकडे हायटेक शस्त्रे दिली जातील. या लग्नावर केवळ स्वॉट कमांडो, तीन राज्यांचे पोलिसच नाही तर एनआयएचीही नजर राहणार आहे. लग्नात काला जथेडी आणि अनुराधा यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. या कुटुंबातील सदस्यांची संख्या दीडशेच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्नसराईत विशेष व्यवस्था
लग्नासाठी मॅरेज गार्डमध्येही अनेक खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सुरक्षेबाबत बोलायचे झाले तर प्रत्येक कोप-यावर सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे पोलिसांची नजर असेल. इतकंच नाही तर येथे उपस्थित असलेल्या वेटर आणि कर्मचा-यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत. लग्नामुळे आजूबाजूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय, लग्नादरम्यान लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि काला जथेडी टोळीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. बंबीहा आणि नीजर बवाना टोळीसह सुमारे डझनभर टोळ्या काला जथेडीचे शत्रू आहेत. त्यामुळे हे लग्न पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR